पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
गुन्हे ठेवा: पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी धडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या परिमंडळ 1 अंतर्गत एका दिवसात तब्बल 43 गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा असून, या कारवाईमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा हालचाली वाढल्या असून, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः नानापेठ भागात झालेल्या कोमकर-आंदेकर गँगच्या गोळीबारामुळे पुणे शहर हादरले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती.
एकाच दिवसात 43 गुंडांना अटक
परिमंडळ 1 चे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली. या पथकाने मात्र 24 तासांत 43 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनेकजण हे शहरातील कुख्यात आंदेकर गँगचे सदस्य असून, काहींवर खून, हत्या प्रयास (कलम 307), दारूबंदी कायदा, शस्त्रबंदी कायदा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नवरात्रीच्या काळात कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख रोखण्यासाठी, विशेषतः टोळ्यांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांची ही मोहीम आहे.
काही दिवसांपूर्वीच घायवळ टोळीकडून गोळीबार
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीने भर रस्त्यात प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार केला. फक्त गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला हा हल्ला इतका गंभीर होता की शहरात एकच खळबळ उडाली. यानंतर या टोळक्याने वैभव साठे या नागरिकावरही कोयत्याने हल्ला केला. सागर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या वैभव यांच्यावर “आम्ही इथले भाई आहोत” म्हणत टोळीतील गुंडांनी दहशतीचा इशारा देत हल्ला केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला होता. यानंतर पोलिसांकडून टोळ्यांवर कारवाई केली जात आहे.
गणेश पेठेत अतिक्रमणविरोधी कारवाई
पुण्यातील गणेश पेठेत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाई करण्यात येतेय. अतिक्रमणांमध्ये मागील वर्षी हत्या झालेले माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या संपर्क कार्यालयाचा समावेश आहे. या ठिकाणी कारवाईसाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Pune Crime : माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर
शुक्रवारी पुणे विमानतळावर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळून आले आहेत. पुणे ते वाराणसी या प्रवासादरम्यान विमानतळावरील सुरक्षा चौकशीदरम्यान ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत बागल (63, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) हे शुक्रवारी रात्री वाराणसीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आले होते. चेक-इन प्रक्रियेपूर्वी त्यांच्या बॅगेची तपासणी सीआयएसएफ व विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी स्कॅनरमधून केली असता, बॅगेत रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संबंधित शस्त्र जप्त करण्यात आले. यामुळे पुणे विमानतळावर एकच खळबळ उडाली होती.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.