लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा, दररोज चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक; पुण्यातील बनावट कॉल सेंटरबाबत ध
गुन्हे ठेवा: पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर (Fake call center) पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. सुमारे दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावरील प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीत हे बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात या कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)
पुणे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले की, आम्हाला काल माहिती मिळाली की, खराडी परिसरात अवैध कॉल सेंटर सुरू आहे. तिथे 123 लोक उपस्थित होते. यात 111 पुरुष आणि 12 महिला हे कॉल सेंटर चालवत होते. यात 8 लोक हे प्रमुख आहेत. या बनावट कॉल सेंटरमधून दररोज 1 लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळवण्यात येत होता. या बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यात येत होते. क्रिप्टो करेंसीच्या माध्यमातून पैसे घेतले जात होते.
दररोज तीस ते चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक
रात्रीच्या वेळी अमेरिकन लोकांची फसवणूक केली जात होती. हा सगळा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडे लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळाला आहे. सध्या पोलीस तपास सुरू आहे. पुढील तपासात आणखी माहिती उघड होणार आहे. आरोपींची संख्या जास्त आहे, त्यामुळे चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एका दिवसाला एक लाख अमेरिकन नागरिकांचा या बनावट कॉल सेंटरमधून डेटा गोळा केला जात होता. तर प्रत्येक दिवशी तीस ते चाळीस हजार डॉलरची फसवणूक केली जात होती, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
41 मोबाईल, 61 लॅपटॉप जप्त
दरम्यान, या कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे. या छाप्यात 41 मोबाईल फोन, 61 लॅपटॉप आणि महत्त्वाचा डिजिटल डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी अमेरिकेतील नागरिकांना डिजिटल अटकेच्या धमक्या देत त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे उघड झाले आहे. या कॉल सेंटरमध्ये सुमारे 123 लोक काम करत होते, आणि त्यापैकी बहुतेक जण गुजरातमधील असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यामधील मुख्य आरोपीदेखील गुजरातचा असल्याची माहिती मिळाली आहे. या छाप्यानंतर सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
https://www.youtube.com/watch?v=2w0tjoudcvc
अधिक पाहा..
Comments are closed.