अरुण गवळीचा पीए बोलतोय, 5 कोटी दे; पुण्यातील भुरट्या गँगचा प्लॅन पोलिसांनी उधळला, नेमकं घडलं का
गुन्हे ठेवा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा ‘पी.ए.’ असल्याचे भासवून तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका तोतया गँगचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तिघांना रंगेहाथ पकडले. या गँगने थेट व्यावसायिकाला फोन करून ‘डॅडी’च्या नावाने पैसे मागितले होते.
5 कोटींच्या खंडणीचा प्रयत्न
याबाबत 49 वर्षीय व्यावसायिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीला फोन करून समोरच्या व्यक्तीने स्वतःला अरुण गवळी यांचा खाजगी सचिव म्हणजेच ‘पी.ए.’ असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘डॅडींना कामासाठी पैसे हवेत’ असे सांगत थेट 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.
पोलिसांची सापळा रचला पण आरोपी फरार
व्यावसायिकाने त्वरित पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपींना पैसे देण्यासाठी बोलावण्यात आले. त्याचवेळी पोलिसांनी कारवाई करून तिघांना घटनास्थळीच पकडले. या कारवाईदरम्यान काही आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिस आरोपींकडून आणखी चौकशी करून त्यांचे पार्श्वभूमी, पूर्वीचे गुन्हे, तसेच खऱ्या अर्थाने त्यांचा अरुण गवळी यांच्याशी काही संबंध आहे का, हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी अशा प्रकारच्या तोतया गँगपासून सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. कोणीतरी स्वतःला प्रसिद्ध व्यक्तीचा नातेवाईक, सचिव किंवा प्रतिनिधी असल्याचे सांगून पैशांची मागणी करत असेल, तर त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
जुगार खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेली जुगार खेळताना भाजपचा पदाधिकारी आढळून आला. जुगार खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आणि सहकारनगर पोलिसांनी ही छापेमारी केली होती, औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे याच्यासोबत इतर 2 ते 3 जण जुगार खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.