निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात संशयाची सुई चंद्रकांत पाटलांवर? राजकीय वरदहस्ताबाबत चौकशीची मागणी
Pune Crime Nilesh Ghaywal: राज्यातील पोलीस यंत्रणेला चुना लावून लंडनला पळून गेलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन आता महायुतीमध्ये अंतर्गत कलह पेटण्याची शक्यता आहे. निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याला पासपोर्ट कसा आणि कोणी दिला, यावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आता शिंदे गटाचे पुण्यातील लोकप्रिय नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे निलेश घायवळ प्रकरणात काहीच का बोलत नाहीत, असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. धंगेकर यांनी पुण्यातील गुन्हेगारीचा चेहरा असणाऱ्या निलेश घायवळ प्रकरणात थेट भाजपच्या (BJP) नेत्याला ओढल्याने आता महायुती वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Pune Crime News)
रविंद्र धंगेकर यांनी बुधवारी ‘एबीपी माझा’शी बोलताना निलेश घायवळ प्रकरणातील चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत, ते गप्प का आहेत? ते या प्रकरणात लक्ष का घालत नाहीत? असे प्रश्न शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केले आहेत. निलेश घायवळ याच्यावर राजकीय वरदहस्त आहे. त्याशिवाय त्याला पासपोर्ट कसा मिळू शकतो? पोलिसांची चौकशी व्हायला हवी. मग घायवळला कोण मदत करत आहे, हे समोर येईल. मी आता सत्तेत असलो तरी खोट्याला खोटं म्हणणारा आहे. मी पुणेकरांचे प्रश्न मांडणारा आह, असे रविंद्र धंगेकर यांनी म्हटले.
Nilesh Ghaywal Passport news: निलेश घायवळने इंग्रजी स्पेलिंग बदलली, पासपोर्ट कसा मिळवला?
निलेश घायवळ याला त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे पासपोर्ट मिळणार नाही, याची खात्री होती. निलेश घायवळ याच्यावर हत्या, अपहरण, खंडणी, अवैधरित्या शस्त्रांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे निलेश घायवळ याने पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग ‘घायवळ’ (Ghaywal) ऐवजी ‘गायवळ’ (Gaywal) असे करुन घेतले होते. मात्र, तरीही त्याला इतके गंभीर गुन्हे दाखल असताना पासपोर्ट कसा मिळाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एरवी सामान्य लोकांना पासपोर्ट देताना त्यांची कसून पडताळणी केली जाते. मग निलेश घायवळ प्रकरणात पासपोर्ट कार्यालय आणि नगर पोलिसांना त्याचे गुन्हेगारी चारित्र्य खटकले नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=I2HH_SYV4FA
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.