पुण्यात वर्दीच्या दादागिरीचं भूत कोण उतरवणार? पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ अन्

गुन्हे ठेवा: पुण्यात काही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “वर्दी” च्या दादागिरी चे भूत डोक्यावर बसलं की काय असा प्रश्न उपस्थितीत होताना दिसतोय. 2 दिवसांपूर्वी पुणे शहरातील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याचा कॅब चालकाला मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता शहरातील आणखी एक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने थेट मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर संबंधित पोलिस उपनिरीक्षकासोबत असलेल्या मित्राने मेडिकल चालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व घटना पुण्यातील नारायण पेठेत 13 ऑगस्ट रोजी घडली. तसेच ही सर्व घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. विजय सरवार असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते चंदननगर पोलीस स्टेशन येथे परिविक्षाधीन (प्रोबेशनल) पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत.विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत मेडिकल चालक महादेव चौरे यांनी फिर्याद दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजण्याचा सुमारास नारायणन पेठेतील मातोश्री मेडिकल येथे फिर्यादी महादेव चौरे हे मेडिकलमध्ये झाडू मारत होते. यावेळी त्यांच्या दुकानासमोर पोलिस उपनिरीक्षक विजय सरवार जर त्यांच्या मित्रांसोबत थांबले होते. दुकानासमोर उभा राहिलेल्या या लोकांना मेडिकल चालकाने बाजूला होण्यास त्यांनी सांगितले. यातून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक विजय सरवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या हनुमंत रायकर यांनी फिर्यादु यांना मारहाण करत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली. त्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, याच प्रकरणात सुमित रायकर यांनी देखील महादेव चौरे यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिल्यावरून मेडिकल चालक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ट्रॅफिक पोलिसाने कॅबला गाडी घासताच चालकाने शिवी हासडली, पुण्यात स्टेशनरोडवर बाचाबाची, मारहाण; व्हिडिओ व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.