पुण्याच्या खेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; कुत्र्यांच्या टोळीनं एका कुत्र्याचा घेतला जीव
पुण्यात कुत्र्यांचा हल्ला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा पुन्हा एकदा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. राजगुरुनगर शहरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय. काही दिवसांपूर्वीच चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या घटनेनंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचे चित्र आता पुन्हा स्पष्ट झाले आहे.
दरम्यानया घटनेमुळे राजगुरुनगर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले आणि नागरिकांना घराबाहेर पडणेहे कठीण झाले आहे. परिणामीनागरिकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे. नगरपरिषदेकडून ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि वारंवार होणारे हल्ले, यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत्यामुळे.
Pune News : उद्यान, हॉस्पिटल, भाजी मंडईसाठी आरक्षित जागेवर भारत मंडपम कन्वेक्शन सेंटर उभारण्याचा भाजपचा घाट?
पुण्यात उद्यान, हॉस्पिटल, भाजी मंडई यासाठी आरक्षित असलेल्या 48 एकर जागेवर भारत मंडपम कन्वेक्शन सेंटर उभारण्याचा घाट घालण्यात येतोय. आज महापालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव दिला जाणार आहे. मूलभूत गरजांसाठी दिलेली जागा कन्वेंशन सेंटरसाठी दिल्याने सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी विरोध केला आहे. पुण्यातील कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी राज्य सरकारकडे या भारत मंडपम कन्वेंशन सेंटरसाठी पाठपुरावा केलाय. त्यामुळे आज महापालिकेत यावर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. जर प्रस्ताव सादर झाला आणि त्याला मान्यता मिळाली तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा विवेक वेलणकर यांनी दिलाय.
दरम्यानही 48 एकर जागा पुण्यातील लोहगाव परिसरात आहे. या परिसराचे आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बापू पठारे आहेत मात्र त्यांचा आमदाराने या जागेसाठी राज्य सरकारला पत्र का दिलं असावं असा प्रश्न वेलणकरांनी उपस्थित केलाय.
Pune News : मगरपट्टा सिटी जवळ कॅनल फुटला; परिसरात मोठी वाहतूक कोंडी
पुण्यात हडपसर परिसरातील मगरपट्टा सिटी जवळ कॅनल फुटला आहे आणि त्यामुळे हडपसर चौकातून मगरपट्टा सिटीकडे जाणाऱ्या रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील झाल्याचे चित्र आहे. या मगरपट्टा सिटीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक पोलिसांनी बॅरिगेटिंग लावल आहे. त्यासोबतच वाहतूक पोलिसांकडून सगळ्यांना माइकद्वारे सूचना देण्यात येत आहे. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.