हिंजवडीतील बसला आग लावलेल्या चालकानं पगार थकवल्याचं सांगितलं कारण; कंपनी मालकाने केला मोठा खुल

पुणे: हिंजवडीत (Pune Hinjwadi Bus Fire) टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात झालेल्या खुलासा सर्वांनाच मोठा धक्का देणारा आहे. टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने दिवाळी बोनस, पगार न मिळाल्यानं आणि मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीच्या रागातून गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात कंपनीचे मालक, त्या बसमध्ये प्रवास करणारे इतर कर्मचारी आणि त्या वाहन चालकांच्या संपर्कात असलेल्यांशी पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती आहे, दरम्यान या व्योमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेश शहा यांनी देखील माहिती दिली आहे.

वाकड परिसरातील हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क येथील फेज एकमध्ये मिनी बसच्या आग प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी व्योमा ग्राफिक्स कंपनीची तपासणी केली. कंपनीचे मालक नितेश शहा यांना घेऊन परिसराची संपूर्ण पाहणी केली. मुद्रण विभाग, केमिकल ठेवण्याची जागा तसेच बाहेरील परिसराच्या नोंदी घेतल्या आहेत. दरम्यान, व्योमा ग्राफिक्स कंपनीने रात्रीत संकेतस्थळ (वेबसाइट) बंद केले असून कर्मचाऱ्यांचे मोबाईलही बंद आहेत.हिंजवडीतील व्योमा ग्राफिक्स कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून बुधवारी चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दिवाळीचा बोनस व पगार कापल्याच्या आणि मजुरांचे काम सांगितल्याच्या रागातून, सहकारी कर्मचाऱ्यांशी असलेल्या वादातून जनार्दन हंबर्डीकर या बस चालकानेच बस पेटवून चार कर्मचाऱ्यांचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी पावणेतीन ते तीनच्या दरम्यान पोलिसांचे पथक कंपनीमध्ये दाखल झाले.

पोलिस पथकाने मुद्रण विभाग, कंपनीतील केमिकल ठेवण्याची जागा तसेच बाहेरील परिसराची तपासणी केली. यावेळी कंपनीचे मालक नितेश शहा यांच्याकडून पथकाने सर्व माहिती घेतली. पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ही घटना अपघात नसून घातपात असल्याचे सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा उलगडा होताच सर्वांना धक्का बसला. गुरुवारी रात्रीच कंपनीने आपले संकेतस्थळ (वेबसाईट) बंद केले आहे. तसेच या दुर्घटनेतील जखमींसह इतर सर्वच कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक बंद केले आहेत.

पगार थकवला नसल्याचा कंपनी मालकाचा खुलासा

बसचालक जनार्दन हंबर्डीकर याने सीटखाली कंपनीतील बेंझिन आणि कापडाचे बोळे ठेवून बसमध्ये आग लावली होती. सहकारी कर्मचाऱ्यांशी असलेला वाद व मालकाने पगार कापल्याच्या आणि बोनस थकवल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्याने पोलिस जबाबात सांगितले होते. याबाबत मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश शहा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कंपनीकडून बसचालकाचे कोणतेच पैसे बाकी ठेवलेले नाहीत. सर्व पैसे दिले आहेत. आम्ही पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत आहोत. बसचालकाने कंपनीतील बेंझिनचा वापर केल्याबाबत मात्र त्यांनी माहिती नसल्याचं सांगितलं आहे.

बेंझिनबाबत कल्पना नाही, मालकाचा खुलासा

पुण्याच्या हिंजवडीतील व्युमा ग्राफिक्स कंपनीने पगार थकवला, म्हणून टेम्पो ट्रॅव्हल पेटवली अशी कबुली चालक जनार्दन हंबर्डीकरने दिली. मात्र आम्ही त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही. असा खुलासा मालक नितेन शाहने केला. परंतु कंपनीतून एक लिटर की पाच लिटर चोरीला गेलं, याबाबत मला कल्पना नाही, असं म्हणत मालकाने सांगितलं आहे. पोलीस कंपनीत येऊन तपास करतायेत, आम्ही त्यांना सहकार्य करतोय, असं शाह म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.