पुण्यातील जेजुरीजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी

पुणे : जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोच्या भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. या दुर्दैवी अपघातात एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जेजुरी (jejuri) मोरगाव रस्त्यावरील एका कंपनी समोर रात्री सव्वा 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे.  दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की 7 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम एच 42 ए एक्स 1060) जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला ( क्र. एम एच 12 एक्स एम 3694 ) मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. येथील रस्त्यावरील एका कंपनी समोरील हॉटेल श्रीराममध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यावरुन, अपघाताची दाहकता लक्षात येईल.

हेही वाचा

50 रुपयाची उधारी मागितल्याने गमावला जीव; लातूरमधील धक्कादायक घटना, पोलीस ताफा घटनास्थळी

आणखी वाचा

Comments are closed.