सतरा वर्षाच्या मुलीला शेतात नेऊन केला घात, विश्वासातल्या माणसानं केलं कृत्य, दोनदा लैंगिक अत्या

पुणे: शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी या गावातील अल्पवयीन 12 वी मध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला शेतात नेत तिच्यावरती दोन वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला.

या घटनेने संताप व्यक्त होत आहे, तर एका घटनेने पुन्हा एकदा महिला, अल्पवयीन मुली यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेबाबत माहिती देताना रूपाली चाकणकर यांनी खेड तालुक्यातील अशा घटना घडू नयेत म्हणून सोमवार पासून शाळेतील मुलीसोबत संभाषण करण्याच्या सूचना बिट मार्शल दामिनी पथकाला दिल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर खेड तालुक्यात 17 वर्षीय तरुणीवर हा प्रसंग घडला हा वेदनादायी आहे. आरोपीला अटक केली आहे , पोलिसांनी तपास चांगला केला आहे. आज पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.

आरोपीचे चार्टसीट तात्काळ दाखल करून गुन्हा फास्ट ट्रॅकवर घेऊन आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. समाजात असे नराधम जगूच नये, ही विकृती आहे. त्याच्या विरोधात आपली लढाई आहे. खेड तालुक्यातील अशा घटना घडू नयेत म्हणून सोमवार पासून शाळेतील मुलीसोबत संभाषण करण्याच्या सूचना बिट मार्शल दामिनी पथकाला दिल्या आहे. आरोपी व्यक्ती ही ओळखीची व्यक्ती आहे आणि समाजामध्ये 90 टक्के हे ओळखीच्या लोकांकडून अन्याय अत्याचार होत आहे, त्यामुळे ओळखीच्या लोकांवर सुद्धा विश्वास ठेवू नये असं आवाहन रूपाली चाकणकरांनी यावेळी केलं आहे.
मुलींना भिती वाटते. ती वाटू नये यासाठी त्यांच्या सोबत दामिनी पथक बोलणे करून तपासणी करतील असंही त्या म्हणाल्या. मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

रूपाली चाकणकरांची सोशल मिडिया पोस्ट

आज मांजरेवाडी ता. खेड, जि. पुणे येथे घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक व संतापजनक घटनेमुळे मन सुन्न झाले आहे. गावातील अल्पवयीन 12 वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर नराधम नवनाथ मांजरे याने शेतात दोन वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत आज मी स्वतः गावाला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबीयांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून मी याप्रकरणी संपूर्ण गंभीरतेने लक्ष ठेवत असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने आणि कठोर कारवाईसाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. हा गुन्हा Fast Track कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, ही महिला आयोगाची ठाम भूमिका आहे.

या भेटी प्रसंगी मा. DySP अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, तपास अधिकारी स्नेहल गुरव, संरक्षण अधिकारी श्री. शेवाळे, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई मोहिते, कविता आल्हाट व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही लढाई केवळ एका पीडितेची नाही, तर आपल्या प्रत्येकाची आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग सजग आहे आणि अशा घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरूच राहील.

अधिक पाहा..

Comments are closed.