भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण की प्रेमप्रकरण ? हिंदू संघटना जनआक्रोश मोर्चा काढणार इतक्यात वेगळीच मा
पुणे: इंदापूर तालुक्यामधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. इंदापुराच्या भिगवण परिसरात लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण (Bhigwan Kidnapping Case) केल्याची घटना काल (मंगळवारी, ता १७) समोर आली. तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरूणांनी तरुणीचं अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या घटनेवर सविस्तरपणे माहिती दिली आहे, त्यानुसार ते दोघे फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे आता या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात आहे, त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.(Bhigwan Kidnapping Case)
या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. जाहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोन आरोपींनी दुचाकीवरुन जाणाऱ्या आई, मुलगी आणि तिच्या भावाच्या डोळ्यांत लाल चटणी टाकून त्यांना अडवलं. त्यानंतर त्यांनी 21 वर्षीय मुलीचं अपहरण केल्याबाबत भिगवण (Bhigwan Kidnapping Case) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ६ टीम रवाना करण्यात आल्या आहेत. विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेले नाकाबंदी या दोन्ही माध्यमातून भिगवण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत”, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे. तर सध्या त्यांचे फोन बंद असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेणं सुरू असल्याचं बिरादार यांनी सांगितलं आहे.(Bhigwan Kidnapping Case)
Bhigwan Kidnapping Case: या प्रकरणाचा घटनाक्रम
* भिगवणमधील अपहरण झालेली मुलगी 21 वर्षांची असुन महाविद्यालयात बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षात शिकते.
* अपहरण झालेल्या मुलीचे आणि आरोपी मुस्लिम मुलाची अनेक वर्षांपासून ओळख आहे. दोघे शेजारी राहतात.
* मात्र मुलीच्या घरच्यांनी तिच लग्नतीच्या जातीत असलेल्या मुलाशी काही महिन्यांपूर्वी नक्की केले होते. 22 फेब्रुवारीला हे लग्न होणार होतं
* पोलिसांना मुलीचे आणि त्या मुलीचे मागच्या महिना भराचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत.
* ही मुलगी तीच्या आई आणि भावासोबत काल खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गेली होती. खरेदी करुन घरी परतत असताना डोळ्यात चटणी टाकून तीचे अपहरण केल्याची तक्रार नातेवाईकांनी केलीय.
* पोलिसांनी शोधासाठी 6 पथके रवाना केलीयत.
* या घटनेनंतर हिंदू संघटनांनी जन आक्रोश निषेध मोर्चा काढण्याचे ठरवले असून भिगवण बंदची हाक दिलीय.
* मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असुन या प्रकरणाला धार्मिक वळण न देता शांतता राखण्याचे आवाहन केलय
* या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
Bhigwan Kidnapping Case: दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचं तपासात समोर
याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती देताना सांगितलं की, किडनॅपिंगची केस आमच्याकडे आली आहे, या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे. यामध्ये जे पीडित आहे ते आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचंही समोर आलं आहे. हे सर्व तपासामध्ये आढळलं आहे, त्या अनुषंगाने काल घटनेनंतर आम्ही चार टीम रवाना केल्या होत्या, सर्वांचे फोन अद्यापही बंद आहेत आणि आमच्या टीम ज्या रवाना झाले आहेत, त्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास करत आहेत. मी सर्व संघटनांना आवाहन करतो की, कोणत्याही पद्धतीच्या अफवांना बळी पडू नये, बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये. पोलीस तपास करत आहेत. यामध्ये जे काही सत्य आहे ते उजेडात येईल. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी पोलीस प्रशासन तपास करत आहे.
Bhigwan Kidnapping Case: दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात, लहाणपणापासूनची ओळख…
12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यानचे आम्ही त्यांचे कॉल डिटेल्स मागवले आहेत. त्या दरम्यान त्यांचे कॉल झालेले दिसत आहेत. टेक्स्ट मेसेज झालेले दिसत आहेत. हे फक्त रेगुलर सिम कार्ड वरून झालेला आहे. व्हाट्सअप चा डाटा अद्याप मिळालेला नाही, त्याची माहिती मागवलेली आहे, त्यामधून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. लहानपणापासून त्यांचे एकमेकांशी ओळख आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या धर्मांचा अँगल आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की आंदोलने मोर्चे करू नयेत. आरोपींना अटक करण्यात येईल. या संदर्भातल्या ज्या प्राथमिक तपासातल्या बाबी समोर आल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. त्यावर लक्ष द्यावं बाकी. आंदोलने वगैरे करू नयेत असं मी आवाहन करतो, आम्ही सध्या सीसीटीव्ही तपासून त्या दृष्टीने तपास करत आहोत. त्या रूटने गेलेले आहेत. त्या रूट चा तपास करत आहोत, आमच्या टीम वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा तपास करत आहेत. लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ असेही पुढे पोलिसांनी माहिती देताना सांगितला आहे.
मुलीचे काका यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मुलगी इथे शिकण्यासाठी नव्हती, ती मामाकडे शिकण्यासाठी होती. ती लग्नासाठी आली होती. खरेदी करायला गेल्यावर तिचे अपहरण केले. ते दोघे शेजारी राहतात, हे खरं आहे, पण ती इथे शिक्षणासाठी नव्हती तर ओळख कशी असेल.पोलीस आम्हाला पाहिजे तशी माहिती देत नाहीत. आमच्या मुलीला लवकरात लवकर शोधावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.