पुण्यातील डिलिवरी बॉय अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला तरुणीचा मित्र

पुणे: कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने पुणे (Pune Crime News) हादरलं. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथकं शोध घेत होती. अखेर या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातूनच या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती.(Pune Crime News)

ही तरूणी घरी एकटी असल्याची संधी साधत कुरिअर देण्याच्या बहाण्याने आरोपीने घरात प्रवेश केला आणि पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने  पुन्हा एकदा पुणे शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत होता. पोलिसांची दहा पथकं त्याच्या मागावर होती. अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

नेमकं प्रकरणा काय?

पुण्यातील कोंढवा परिसरातील 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार 28 ते 30 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत कामाला आहे. ती दोन वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यावेळी आरोपीने दरवाजा वाजवला. तेव्हा त्याने कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं. तरुणीने कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे सांगितले आणि सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. यामुळे तिचे डोळे जळजळले अन् आरोपी घरात शिरला. त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तिचे फोटो काढले. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ 5चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली

आणखी वाचा

Comments are closed.