पोलिसांवर मारहाण अन् शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींविरोधातच गुन्हा दाखल; नेमकं कारण क

Pune Kothrud Crime पुणे: कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी (Pune Kothrud Crime) श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील पोलीस आयुक्तालयात कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. या सगळ्या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं. त्यामुळे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे आमदार रोहित पवार, सामाजिक अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे देखील रात्रभर उपस्थित होते. मात्र यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.

नेमकं प्रकरण काय?

एक ऑगस्टला हा सगळा प्रकार समोर आला होता. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. तुम्ही महारा मांग्याच्या पोरी आहात, किती मुलांसोबत झोपलेत आणि लेसबियन आहात का? अशा घाणेरड्या शब्दात पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून या मुलींना प्रश्न विचारले होते, असा आरोप तीन मुलींनी केला होता. याप्रकरणी या मुली आणि त्यांचे काही सहकारी आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं होत. आणि त्यांनी थेट पोलिसांकडेच दाद मागायला सुरुवात केली आहे मात्र पोलिसांकडनं कोणतीही दाद मिळत नसल्याचा आरोप देखील याच मुलींच्या सहकाऱ्यांनी केला होता.

पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद-

कोथरूड पोलिसांच्या विरोधात या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयात 3 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपासून रात्री तीन वाजेपर्यंत पीडित दोन मुली त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारी श्वेता पाटील, परिक्रमा खोत, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर  त्यांचे इतर 50 ते 60 सहकारी पोलिस आयुक्तालयात ठिय्या मांडला होता. या संपूर्ण प्रकरणी कोणत्याही तथ्य आढळले नसल्याचे  संपूर्ण घटना इंडोर घडल्याचं  पत्र पुणे पोलिसांनी या सगळ्यांना दिलं होतं. श्वेता पाटील हिने पोलिसांसमोरच फाडून टाकलं होतं. त्यानंतर दोन  मुलींचे वैद्यकीय अहवाल समोर आले होते. त्यात मारहाण केल्याच्या कोणत्याही ताज्या जखमा किंवा व्रण नसल्याचं समोर आलं होतं. या सगळ्या प्रकरणानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. कोथरुड प्रकरणातील तीन मुलींसह पाच जणांविरोधात पुणे पोलीसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=URSKMCFI8WE

संबंधित बातमी:

तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां# आहात की लेस्बियन आहात? कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप

आणखी वाचा

Comments are closed.