पुण्यात झुंडशाहीने पोलिसांवर दबाव आणला, पुरावे नसताना अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची मागणी, भाजपचा

गुन्हे ठेवा: पुण्यातील  कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्यानंतर धक्कादायक आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुजाता आंबेडकर, अंजली आंबेडकरांसह आमदार रोहित पवारही पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते.  आमदार रोहित पवारांनी याप्रकरणी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता भाजपने रोहित पवारांवर  पलटवार केलाय.

पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात रात्री उशिरापर्यंत पोलिसांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणण्यात आला. रोहित पवार यांची 15 दिवसातील ही दुसरी घटना आहे.पुण्यात झुंडशाहीने पोलिसांवर दबाव आणला, पुरावे नसताना अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची मागणी केली असा पलटवार भाजप नेते केशव उपाध्ये यांनी आमदार रोहित पवारांवर केलाय.

पोलिसांवर दबाव आणला: केशव उपाध्ये

पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात रात्री उशिरा पर्यंत पोलिसांवर कारवाई करावी यासाठी दबाव आणण्यात आला. रोहित पवार यांची १५  दिवसांतील ही दुसरी घटना आहे. त्यांनी 15 दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. आता रात्री उशिरा देखील झुंडशाहीने एट्रोसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात अली.  रात्री उशिरा आम्ही सांगतो म्हणून गुन्हे दाखल करा अशी मागणी होती. यावेळी पुरावे सादर करण्यात आले नाहीत. पुरावे नसताना गुन्हे दाखल करा अशी मागणी होत होती. झुंडशाही करून असे गुन्हे दाखल करायला लावणे हीच शरद पवार यांची भूमिका आहे का याच उत्तर द्यायला हव, असं भाजप नेते केशव उपाध्ये म्हणाले.कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली, यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी FIR नोंदवला नाही, त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत,असे रोहित पवार यांनी म्हटल्यानंतर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी हा पलटवार केलाय.

काय म्हणाले होते रोहित पवार?

1. एवढा प्रचंड रोष असतानाही पोलिसांनी FIR का नोंदवला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता?
2. छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील ती पिडीत युवती कोण?
3. या प्रकरणाशी संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण? त्यांचा पोलिसांवर दबाव होता का? या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याने पोलिसांना फोन केले?
4. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानगी घेतली होती का?
5. कोथरूडला तीन युवतींची चौकशी करण्यात आली, एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी नेले, यासाठी पोलिसांकडे तसा सर्च वारंट होता का?
6. चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलीस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या? पोलीस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत? या व्यक्ती पोलीस दलातील कुणाशी संबंधित आहेत? कुणाशी त्यांची मैत्री आहे? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
7. या तीन युवतींना जीवे मारण्याची धमकी कुणी आणि का दिली?

एकूणच या प्रकरणात पोलीस प्रशासनाने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्यावरून पोलिसांवर असलेला राजकीय दबाव स्पष्ट दिसत असून पोलीस यंत्रणा केवळ राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत, असा समज पसरत आहे. परिणामी पोलीस यंत्रणेविषयीच जनतेत अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.