300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीव


Parth Pawar Land Scam Pune Sheetal Tejwani News : मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी (Land Scam Pune) आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांनी काल (गुरूवारी, ता ४) कोर्टात हजर केलं. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शितल तेजवानीला पुणे कोर्टाकडून आठ दिवस म्हणजे 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी सरकारी वकिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या, त्यानंतर तेजवानीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune Land Scam: रक्कम रोख व इतर मार्गाने घेतली किंवा कशी घेतली?

शीतल तेजवानी हिने ११ हजार रुपयांचा डीडी कोणत्या आधारावर भरला, जमिनीच्या किमतीचा खरेदीखतामध्ये उल्लेख का केला नाही? रक्कम रोख व इतर मार्गाने घेतली किंवा कशी घेतली? या गुन्ह्याचा कट रचण्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत ? मूळ वतनदार यांच्याकडून घेतलेले मूळ पॉवर ऑफ अॅटर्नी, मूळ विकसन करारनामे व इतर वेगवेगळे दस्त तिच्याकडून हस्तगत करायचे आहेत. जमिनीचे पैसे कोणत्या मार्गाने व कोणत्या खात्यामध्ये कसे घेतले आहेत, याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील अमित यादव यांनी आरोपी शीतल तेजवानी हिला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती.

Pune Land Scam: बेकायदा खरेदीखत अस्तित्वात आणण्यामागे त्यांचा काय हेतू होता?

जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, खरेदीखतात तेजवानी व ‘अमेडिया’ यांनी मालक असा केलेला उल्लेख दिशाभूल करणारा आहे. त्यांना ही मिळकत विक्रीचा कुठलाही अधिकार नव्हता. सध्या ही मिळकत बॉटनिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवाटीत आहे. ही मिळकत कधीही आरोपीच्या ताब्यात नव्हती. मिळकत १२०० कोटींपेक्षा जास्त किमतीची असताना ३०० कोटींस दाखविण्याचा त्यांचा उद्देश काय होता?, बेकायदा खरेदीखत अस्तित्वात आणण्यामागे त्यांचा काय हेतू होता? याचा सखोल तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी तिला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे जमीन घोटाळा: २१ कोटींचे मुद्रांक शुल्क आम्ही भरणारच नाही

मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी उद्योग विभागाने दिलेले इरादा पत्र योग्यच असून, त्यानुसारच आम्ही मुद्रांक शुल्कात सवलत घेतलेली आहे. त्यामुळे ती देण्याचा प्रश्नच उ‌द्भवत नाही, असा पवित्रा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने घेतला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.