‘मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या’; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरातील (Pune Land Scam) जमीन गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असलेली शीतल तेजवानी हीला पोलिसांनी अटक केली आहे. काल (गुरूवारी, ता ४) तिला कोर्टात हजर करण्यात आलं,यावेळी तेजवानीला ११ डिसेंबरपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अमेडिया कंपनीशी संबंधित भागीदार दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी देखील वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.(Pune Land Scam)
Pune Land Scam: लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना चौकशीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार दिग्विजय पाटील हे 2 डिसेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले. त्यावेळी ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांनी त्यांची अनेक मुद्द्यांवर सविस्तर चौकशी केली. चौकशीदरम्यान पाटील यांनी, ‘गरज असल्यास मी पुन्हा उपस्थित राहील. मला परदेशात जय पवार यांच्या लग्नाला जायचं असल्यानं, लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन,” असंही आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांनी परदेशात लग्नसमारंभासाठी जाणार असल्याचंही या चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती आहे.(Pune Land Scam)
Pune Land Scam: बहरीनमध्ये जय पवारांच्या लग्नाला दिग्वीजय पाटील जाण्याची शक्यता
दुसरीकडे, बहरीनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्न सोहळ्याची तयारी सुरू आहे. या सोहळ्यास दिग्विजय पाटील हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्यावरच खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदलेला आहे. दरम्यान, याच प्रकरणात आधीच शीतल तेजवानी हिला अटक झाली असून तिच्या चौकशीदरम्यान उघड झालेल्या माहितीमुळे पार्थ पवार यांच्या अडचणीही वाढू शकतात, अशी चर्चा आहे. अमेडिया नावाच्या कंपनीमध्ये 99 टक्के भागभांडवल पार्थ पवार यांच्या नावावर असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापलं होतं.
Pune Land Scam: शीतल तेजवानीला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
शीतल तेजवानी हिने ११ हजार रुपयांचा डीडी कोणत्या आधारे भरला, जमिनीच्या किमतीचा खरेदीखतामध्ये उल्लेख का केला नाही? रक्कम रोख व इतर मार्गाने घेतली किंवा कशी घेतली? या गुन्ह्याचा कट करण्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत ? मूळ वतनदार यांच्याकडून घेतलेले मूळ पॉवर ऑफ अॅटर्नी, मूळ विकसन करारनामे व इतर वेगवेगळे दस्त तिच्याकडून हस्तगत करायचे आहेत. जमिनीचे पैसे कोणत्या मार्गाने व कोणत्या खात्यामध्ये कसे घेतले आहेत याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील अमित यादव यांनी आरोपी शीतल तेजवानी हिला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, खरेदीखतात तेजवानी व ‘अमेडिया’ यांनी मालक असा केलेला उल्लेख दिशाभूल करणारा आहे. त्यांना ही मिळकत विक्रीचा कुठलाही अधिकार नव्हता. सध्या ही मिळकत बॉटनिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवाटीत आहे.
ही मिळकत कधीही आरोपीच्या ताब्यात नव्हती. मिळकत १२०० कोटींपेक्षा जास्त किमतीची असताना ३०० कोटींस दाखविण्याचा त्यांचा उद्देश काय होता?, बेकायदा खरेदीखत अस्तित्वात आणण्यामागे त्यांचा काय होत होता? याचा सखोल तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी तिला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आणखी वाचा
Comments are closed.