पती पत्नीचं पटेना; एकमेकांपासून फारकत, जन्मदात्या आईने 13 वर्षीय मुलीचा गळा आवळला, 6 वर्षाच्या

पुणे : मंचर येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. एका महिलेने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत (Pune Crime News) उडी घेतल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मृत मुलाचे नाव निहांत आशिष बाणखेले (वय ६) असे असून, जखमी मुलगी परिज्ञा आशिष बाणखेले (वय १३) हिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी महिला हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) हिच्याविरोधात खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: काही महिन्यांपासून सतत वाद

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते. दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणानंतर दोघे वेगळे राहत होते. पती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता, तर हर्षदा बाणखेले ही मंचरमधील लालबाग प्रेस्टिज परिसरात आपल्या दोन मुलांसह राहत होती. मात्र, पतीसोबतचा वाद कायम होता. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हर्षदा बाणखेले हिने मुलगी परिज्ञाचा घरात वायरीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. गळा आवळल्याने परिज्ञा बेशुद्ध पडली. ती मृत झाल्याचा समज करून आरोपी महिलेने घराला बाहेरून कुलूप लावले.(Pune Crime News)

Pune Crime News: तिने मुलासह विहिरीत उडी मारली ती वाचली पण…

यानंतर ती सहा वर्षांच्या निहांतला सोबत घेऊन स्कुटीवरून तपनेश्वर स्मशानभूमीलगतच्या विहिरीजवळ गेली. मुलाचा जीव घेण्याच्या उद्देशाने तिने मुलासह विहिरीत उडी मारली. पाण्यात बुडून निहांतचा मृत्यू झाला. मात्र, विहिरीत असलेल्या पाइपचा आधार मिळाल्याने आरोपी महिला बचावली. ही घटना लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत दोघांना विहिरीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी निहांतला मृत घोषित केले. दरम्यान, ग्रामस्थांनी घराचे कुलूप तोडून पाहिले असता परिज्ञा जखमी अवस्थेत आढळून आली. तिलाही उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी महिलेचा पती आशिष बाणखेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक यशवंत यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.(Pune Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.