मोठी बातमी! अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ‘एबीपी माझा’ने
पुणे मोशी इमारत कोसळली: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी येथील महापालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेली भीषण अपघातप्रकरणी (पुणे मोशी इमारत कोसळली) एक मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास 81 तास मदत व बचावकार्य (Building Collapse) सुरू राहिलेल्या पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनाप्रकरणी (Moshi accident) अखेर कारवाईला वेग आलाय. एबीपी माझाने पोलखोल केल्यावर पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी खडबडून जागे झालेत. त्यांनी या दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत. प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात पालिकेने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलाय. यातील गुप्तांना पोलिसांनी रात्रीचं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. (मोशी इमारत कोसळली)
Moshi Building Collapse : प्लांटमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने इमारतीचा काही भाग कोसळल्याचा ठपका
दरम्यानमोशीतीएल या भीषण दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू, तर 12 कामगार जखमी झालेत. एसआरएफ प्लांटमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने इमारतीचा काही भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. एबीपी माझाने सर्वप्रथम उघड केलेला आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे, दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला नव्हता. यावर ही आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि कंत्राटदार कंपनीसह पालिकेचं पर्यावरण विभागही अडचणीत आलं. याचं प्रकरणी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्या भूमिकेवरही आयुक्तांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. दोघांच्या प्रथमदर्शनी चुका दिसत असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट करत, दोघांना नोटिसा ही धाडल्या आणि त्यांच्याकडील सर्व कामकाज काढून घेतलंय.
24 तासांच्या आत उत्तर दिल्यानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता
नोटिशीला 24 तासांच्या आत उत्तर दिल्यानंतर संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, राज्याच्या नगरविकास विभागाने विभागीय आयुक्त शीतल तेली यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली असून, या दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याचं काम सुरू आहे.
Pune Moshi Building Collapse: कचऱ्याचा डोंगर ठरला ‘काळ’
बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे या मोशी कचरा डेपोमधील ‘लेगसी वेस्ट’चा हाच प्रचंड ढिगारा अचानक घसरला. तो थेट या तीन मजली देखण्या इमारतीवर येऊन कोसळला. कचऱ्याच्या अफाट वजनामुळे आणि दाबामुळे इमारतीचा मोठा भाग पत्त्यांसारखा कोसळला आणि आत काम करणारे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले.
इतर महत्वाच्या बातम्या
Comments are closed.