नेत्यांचे वारसदार ते अंडरवर्ल्ड गँगच्या लेडी डॉन, पुण्यात कोणी उधळला गुलाल अन् कोण घरी बसलं? य
पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या पार्श्वभूमीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्य थेट निवडणुकीच्या रिंगणात (Pune Municipal Election Results 2026) उतरल्याचे चित्र दिसत असताना, दुसऱ्या बाजूला आजी-माजी आमदार, मंत्र्यांची मुले-सुना यांना उमेदवारी देत घराणेशाहीचेही (Pune Municipal Election Results 2026) स्पष्ट दर्शन घडलं. विविध पक्षांकडून दिल्या गेलेल्या या उमेदवारांमुळे महापालिका निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांपुरती न राहता, गुन्हेगारी आणि घराणेशाहीच्या वादाभोवती फिरताना दिसून आली. पक्षांनी उमेदवारी दिलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची, घराणेशाहीतील, आजी-माजी आमदार पुत्र निवडणुकीत नेमकं काय झालं जाणून घेऊया सविस्तर(Pune Municipal Election Results 2026)
Pune Municipal Election Results 2026 : गुन्हेगारी कुटुंबातील चार जण निवडणुकीच्या रिंगणात
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात तीन महिला राष्ट्रवादी (अजित पवार)कडून निवडणूक लढवत आहेत. त्यातील दोघी तुरुंगातून निवडणूक लढविणार आहेत. नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या प्रभाग क्रमांक २३ रविवारपेठ नानापेठमधून निवडणुकीला उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनीमधून कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक ३९मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)कडून गुंड बापू नायर निवडणूक लढवत आहेत.
सोनाली आंदेकर-विजय
लक्ष्मी आंदेकर – विजयी
जयश्री मारणे – पराभव
गुंड बापू नायर – पराभव
बंडू आंदेकर – पराभव
Pune Municipal Election Results 2026 : घराणेशाही, आजी-माजी आमदार पुत्र निवडणुकीत उभे
पालिका निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक, दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण, माजी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर निवडणुकीत उभे राहिले आहेत. काँग्रेसने माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे अविनाश बागवे, शिंदसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे प्रणव धंगेकर, उध्दवसेनेचे महादेव बाबर यांचा मुलगा प्रसाद बाबर यांच्या मुलासह वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार)चे बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. कोण जिंकलं कोणाच्या पदरी पराभव आला जाणून घ्या.
स्वरदा बापट – विजयी
कुणाल टिळक- विजयी
सनी निम्हण- विजयी
अभिजीत शिवरकर- विजयी
सुरेंद्र पठारे- विजयी
ऐश्वर्या पठारे- विजयी
अविनाश बागवे – पराभूत
प्रणव धंगेकर- पराभूत
प्रसाद बाबर- पराभूत
पृथ्वीराज सुतार- विजयी
सायली वांजळे-विजयी
आणखी वाचा
Comments are closed.