नवले ब्रीज अपघातानंतर धक्कादायक दृश्य; रस्त्यावर पडलेले पैसे-दागिन्यांचे तुकडे गोळा करणाऱ्यांचा


पुणे : नवले ब्रीज परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातानंतरचा (Pune Navale Bridge Accident) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताच्या ठिकाणी अनेक व्यक्ती रस्त्यावर विखुरलेले पैसे किंवा सोन्यासारख्या वस्तू गोळा करताना दिसतात. यावरती नेटकरी संताप (Pune Navale Bridge Accident)व्यक्त करत आहेत. अपघातात एका कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने आठ ते दहा वाहनांना जोरदार धडक दिली. एका कारचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन आग लागली आणि या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्या ठिकाणी पडलेले पैसे मृतांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांचे तुकडे गोळा करण्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला असून या वर्तनामुळे नेटकऱ्यांनीकडून संताप व्यक्त केला जात आहे. “माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना” असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.(Pune Navale Bridge Accident)


अपघातात काही क्षणांतच ८ जण जळून खाक झाले

बंगळुरू पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरलं. ही संध्याकाळ आठ निष्पाप जीवांसाठी ‘काळ’ ठरली. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष आणि जखमींच्या नातेवाइकांचा हंबरडा हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ८ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये एक ३ वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. दरम्यान, प्रामुख्याने कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिड्रोल टँकला आग लागली आणि काही क्षणांतच आगीचे लोट आकाशात झेपावले. सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली, कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

आणखी वाचा

Comments are closed.