ड्राय डे असूनही पुण्यात सर्रास मद्यविक्री सुरूच; मध्यरात्री पार्ट्या अन्.., 8 ते 10 पबवर कारवाई
पुणे: ड्राय डे असतानाही मद्य विक्री केल्याप्रकरणी पुण्यातील आठ ते दहा पबवर कारवाईचा बडगा उगारला आहे. 15 ऑगस्ट निमित्त पुण्यातील विविध पबमध्ये काल रात्री 1.30 वाजेपर्यंत पार्ट्यांचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र रात्री बारानंतर “ड्राय डे” असताना सुद्धा पुण्यातील अनेक नामांकित पबमध्ये सर्रास मद्य विक्री सुरू असल्याचं आढळून आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वत्र “ड्राय डे” असतो, याचाच अर्थ रात्री बारानंतर मद्य विक्री करण्यास कोणालाही परवानगी नाही, असं असताना सुद्धा पुण्यातील अनेक पबमध्ये रात्री बारानंतर मद्य विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात ड्राय डेचं उल्लंघन
पुण्यातील कल्याणीनगर विमाननगर तसेच बंडगार्डन परिसरातील अनेक नामांकित पब वर कारवाई करण्यात आली. आकाई, मीलर्स, बी एच के, गेम पलासियो, बॉलर यासारख्या प्रसिद्ध पबवर ही कारवाई करण्यात आली आहे. 15 ऑगस्टनिमित्त देशभरात ड्राय डे असतो. मात्र, पुण्यात ड्राय डेचं उल्लंघन करण्यात आलं. शहर परिसरातील पब रात्री दीड वाजेपर्यंत चालू होते. तसेच पबमध्ये रात्री बारानंतरही मद्यविक्री सुरू असल्याचं आढळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाईचा बडगा उभारला आहे.
कोणत्या पबवरती कारवाई
पुण्यातील कल्याणीनगर, विमाननगर तसेच बंडगार्डन परिसरातील अनेक नामांकित पबवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आकाई, मीलर्स, बी एच के, गेम पलासियो, बॉलर यांसारख्या प्रसिद्ध पबवर कारवाई करण्यात आली आहे. पबवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.