Pune News – सतत मटन आणि दारू, श्रावणातही तोच हट्ट, शेवटी संतापलेल्या बापाने मुलाला संपवलं, आईनेही साथ दिली
पुण्यातील वारजे माळवाडीत श्रावण महिना सुरू असताना दारू पिऊन घरी आलेल्या मुलाने मटनाचा हट्ट केला. मात्र, आई-वडिलांनी नकार दिला आणि वाद विकोपाला गेला. या झटापटीत वडिलांनी मुलाला मारहाण केली आणि या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना 24 ऑगस्ट रोजी वारजे माळवाडी भागातील रामनगर परिसरात घडली आहे. मारहाणीत मृत्यू झालेला महेशचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, दारुच व्यसन आणि कामधंदा करत नसल्यामुळे त्याची बायको दोन मुलांना घेऊन त्याला सोडून गेली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. एकटा राहत असलेला महेश जेवणासाठी आई-वडिलांकडे जायचा. मात्र, तो कायम दारूच्या नशेत असायचा आणि जेवणासाठी मांसाहराचा हट्ट धरायचा. या कारणामुळे बाप-लेकात अनेकवेळा खटके उडाले होते.
असाच प्रकार 24 ऑगस्टला रात्री घडला. श्रावण महिना असल्यामुळे आई-वडिलांनी मटन करण्यास नकार दिला. याच नकारामुळे वडील भागवत सूर्यभान गायकवाड आणि मुलगा महेश यांच्यात भांडण झालं. वडिलांनी महेशला मारहाण केली आणि या मारहाणीत महेशचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याची आई पार्वती यांनी आपल्या नवऱ्याची मदत करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केलं आहे.
Comments are closed.