शिरूरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती भिडले; अशोक पवारांनी जाब विचारताच माऊली कटकेंनी सुन


पुणे: शिरूरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडले. दोन दिवसांपूर्वीच आमदार माऊली कटके (MLA Mauli Katke) यांच्या गाडीने एका चिमुकल्याला उडवलं होतं, त्यानंतर आमदार अशोक पवार (Ashok Pawar) आक्रमक झाले होते. शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरून ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके (MLA Mauli Katke)व अशोक पवार या आजी-माजी आमदारांत शाब्दिक बाचाबाची झाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी बाचाबाची झाली. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविल्यानंतर शांततेचे आवाहन करीत हे आजी-माजी आमदार निघून गेले.

आमदार माऊली कटके यांनी शहरातील अनेक मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीची तसेच मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी ते काही मतदान केंद्रात जाऊन माहिती घेत असल्याचे समजताच व ते उर्दू शाळेजवळील मतदान केंद्रात गेल्याचे आपल्या कार्यकर्त्यांकडून समजताच अशोक पवार यांनी या मतदान केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

MLA Mauli Katke VS Ashok Pawar: आपण आमदार आहात, कायदा पाळा, नीट वागा

आमदार कटके मतदान केंद्रातून बाहेर येताच पवार यांनी त्यांना या कृत्याचा जाब विचारला. तुम्हाला कायद्याने मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आपण एक लोकप्रतिनिधी असून, तुम्हाला हे बेकायदा कृत्य करणे पटते का? प्रत्येक मतदान केंद्रात जावून पाहणी करणे योग्य आहे का? असा सवाल केला. त्यावर कटके यांनी आपण बाजूला या चर्चा करू, असे म्हणताच पवार यांनी तुम्ही आत का गेला याचे उत्तर द्या? असा तगादा लावत या घटनेचे व्हिडिओ चित्रण करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले. मतदान केंद्राधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना बोलवा, असे ते म्हटले त्यावर तुम्ही चिडू नका, रागावू नका, हायपर होऊ नका, असे आमदार कटके म्हणाले. त्यावर आपण आमदार आहात, कायदा पाळा, नीट वागा असा सल्ला दिल्याने आमदार कटके काहीसे संतप्त झाले. पराभव दिसायला लागल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली का काय? सीसीटीव्ही चित्रण तपासा असे म्हणत ते निघून गेलs. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

आणखी वाचा

Comments are closed.