ट्रॅफिक पोलिसाने कॅबला गाडी घासताच चालकाने शिवी हासडली, पुण्यात स्टेशनरोडवर बाचाबाची, मारहाण; व
गुन्हे ठेवा: पुणे रेल्वे स्थानकासमोर वाहतूक पोलीस कर्मचारी आणि एका कॅब चालकात वादावादी शिवीगाळ अन् मारहाणीची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय . पुणे रेल्वे स्टेशनच्या समोरून जात असताना कॅब चालकाच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला . (Pune News)
पोलिसाच्या गाडीनेच कॅब चालकाची गाडी घासल्याचा आरोप करत कॅब चालक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी सुरू झाली .तुझं नाव सांग असे म्हणत कॅब चालक मागे लागल्याचं पाहून पोलीस कर्मचारी गाडीत बसून निघाल्याचे दिसताच कॅब चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला शिवी हासडली . गाडीतून उतरत ट्राफिक पोलिसाने कॅब चालकाच्या कानशीलात लगावली . हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय .
व्हिडिओमध्ये नेमकं काय ?
वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलीस गाडीत बसत असताना एक व्यक्ती तुझं नाव सांग असं म्हणत संतापून बोलताना दिसतोय . बोलत असताना त्याच्या मोबाईल रेकॉर्डिंग सुरू आहे . पोलीस कर्मचाऱ्याची गाडी धडकून गेल्याचं सांगत हा कॅबचालक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव विचारतो . पोलीस कर्मचारी गाडी घेऊन पुढे जाताना दिसताच कॅबचालकानं पोलीस कर्मचाऱ्याला शिवी दिल्याचे दिसते . त्यानंतर गाडी थांबवत पोलीस कर्मचारी गाडीतून धावत कॅबचालकाला मारहाण करताना दिसतो . गाडी ठोकून मारहाण केल्याचं सांगत कॅबचालक ‘तुझ्यावर कम्प्लेंट करतो . .. ‘ असे म्हणताना या व्हिडीओत दिसत आहे .
ट्राफिक पोलीस असून गाडी धडकून परत मारहाण केल्याचं सांगत गाडीच्या नुकसानाची भरपाई मागताना कॅब चालक दिसत आहे .पोलीस झाला म्हणजे काहीही करायचा अधिकार मिळाला का ? असा सवाल करत तुझा विरोधात तक्रार दाखल करतो असे म्हणताना कॅब चालक दिसत आहे .
पोर्शे अपघात प्रकरणी पोलिसांची न्यायालयात धाव
पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Porsche crash case) प्रकरणात अल्पवयीन कारचालकावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्याची मागणी पुणे बाल न्याय मंडळांनी फेटाळल्यानंतर पुणे पोलीस सत्र न्यायालयात गेले आहेत. बाल न्याय मंडळाच्या निर्णयात त्रुटी असल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. कल्याणी नगर अपघात प्रकरणात कारचालकाचा गुन्हा निर्घृण श्रेणीत मोडत नसल्याचा निकाल बाल न्यायालय मंडळाने दिला होता. या निकालात स्पष्टता नसल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.