अजित पवारांसोबत अमोल कोल्हे आणि रोहित पवारांची दोन तास गुप्त बैठक, नेमकी काय झाली चर्चा?
पुणे : महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का? असा सवाल उस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेली चर्चा फिस्कटल्याची माहिती देखील मिळत आहे. अशातच राज्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि आणदार रोहित पवार यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या तिघांची आणखी एक गुप्त बैठक झाली आहे. पुण्याच्या बंगल्यात दुपारी दोन तास चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही. बैठक झाली, याला दोन्ही बाजूंनी दुजोरा देण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा झालाय, तिथं मैत्रीपूर्ण लढू
पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र याव्यात, या अनुषंगाने आज दुपारी पुन्हा एक गुप्त बैठक पार पडली. अजित पवारांची शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसह तब्बल दोन तास चर्चा झाली. दुपारी साडे तीन ते साडे पाच दरम्यान ही बैठक झाली, याला दोन्ही बाजूच्या स्थानिकांनी दुजोरा दिला आहे. आता ज्या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा झालाय, तिथं मैत्रीपूर्ण लढूयात आणि इतर ठिकाणी एकत्र लढूयात अशी चर्चा तिसऱ्या बैठकीत झाली आहे.
दोन्ही पवार एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही
शरद पवार राष्ट्रवादीनं तीस जागांची मागणी केली आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरात किती जागा पडणार, हे ही ठरलेलं नाही. त्यामुळं अद्याप ही दोन्ही पवारांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाला नाही. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे, नाना काटे हे अजित पवार गटाचे स्थानिक नेते तर शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे हे शरद पवार गटाचे स्थानिक नेते उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी अजित दादांच्या जिजाई बंगल्यावर पहिली बैठक झाली होती, मग आज सकाळी आणि त्यानंतर दुपारी अशा आतापर्यंत तीन बैठका झाल्यात. पण त्यानंतर ही दोन्ही पवार एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या:
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
आणखी वाचा
Comments are closed.