येशूला देव माना इतर कोणता देव नाही, हिंदू नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्याचा प्रयत्न

बातम्या ठेवा: पुण्यातील पिंपरी कॅम्पमध्ये (Pimpri Camp)  धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. येशूला देव माना इतर कुठलेही देव नाहीत. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख, समृद्धी लाभेल असे म्हणून पिंपरी कॅम्प येथे धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हिंदू धर्मातील नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफर जाविन जेकॉब (Schaefer Javin Jecob), स्टीव्हन विजय कदम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. यांच्यासह 16 वर्षीय बालकाचा यात समावेश आहे. नोटीस देऊन पिंपरी पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे. पिंपरी कॅम्पमध्ये अमेरिकन नागरिक असलेल्या शेफर जेकॉब आणि स्टीव्हन कदम हा हिंदू धर्मातील नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. नागरिकांच्या घराबाहेर जाऊन त्यांना आवाज देऊन येशू विषयी माहिती दिली जात होती.

नागरिकांना पैशांच देखील अमीष दाखवलं

ख्रिश्चन धर्म किती श्रेष्ठ आहे, हे सांगितलं जातं होत. ख्रिश्चन धर्म वगळता कुठलाच धर्म महत्वाचा नाही. या विश्वासात केवळ येशूच आहे. इतर धर्म केवळ कथा आहेत. इतर देवतांना न मानता तुम्ही येशूला माना असे सांगून नागरिकांना धर्मांतर करण्याचा प्रयत्न अमेरिकन नागरिक आणि भारतीय नागरिक असलेला स्थिव्हन कदम करत होता. ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन केल्यास तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य लाभेल. अस नागरिकांना पटवून दिले जात होत. पैशांचा देखील अमीष दाखवलं जात होतं. अखेर याप्रकरणी काही सजग नागरिकांनी थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पिंपरी पोलिसांनी तात्काळ अमेरिकन नागरिक आणि भारतीय नागरिकाला अटक केली आहे. अमेरिकन नागरिक शेफर जेकॉब हा एक वर्षाच्या मुदतीवर भारतात आलेला आहे.

येशूलाच देव माना, दुसरा कोणताही देव नाही असं सांगून धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न

पिंपरी कॅम्पमध्ये अमेरिकन नागरिक असलेल्या शेफर जेकॉब आणि स्टीव्हन कदम हा हिंदू धर्मातील नागरिकांचं ख्रिश्चन धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. येशूलाच देव माना, दुसरा कोणताही देव नसल्याची माहिती हे दोघे नागरिकांना देत होते. ख्रिश्चन धर्मात सुख, समृद्धी लाभेल असे म्हणून पिंपरी कॅम्प येथील नागरिकांचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या:

Ragini Khanna : गोविंदाची भाची हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन झाली? अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा!

आणखी वाचा

Comments are closed.