पुणे पोलीस आयुक्त सात पिढ्यांच्या अद्दल घडलण्याचं सोडा; सात आठवड्यातल्या घटना एकदा बघा; पुणे पो
पुणे: सात पिढ्या लक्षात राहतील अशी अद्दल घडवू असं म्हणणाऱ्या पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून मात्र मागच्या सात आठवड्यात होणारी गुन्हेगारी पण थांबवता आली नसल्याचे मागील काही दिवसात घडलेल्या घटनांमधून समोर आले. पुणे शहरात रात्रीच्या वेळी असू देत किंवा दिवसभरात कोयता हल्ले वाहनांची तोडफोड सोबतच चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात समोर आल्यात. त्यामुळे पुणेकरांची रात्रीची झोप मात्र उडाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार भयमुक्त पुणे करू त्यासोबतच गुन्हेगारांची ठासू अशा शब्दात भाषण देताना दिसतात मोठ मोठ्या कार्यक्रमात भयमुक्त गणेशोत्सवाची ग्वाही देताना दिसतात. मात्र, मागील काही घटनांमध्ये पुणे पोलीस आयुक्त नेमकं करताय काय? असे प्रश्न उपस्थित झालेत.
मागील काही दिवसांत झालेल्या घटना…
२८ जून: चतुःशृंगी पोलिसांच्या हद्दीत विधाते वस्ती येथे १५ जणांचा धुडगूस.
२८ जून : सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे चौघांनी राडा घालून १५ वाहनांची तोडफोड केली.
३ जुलै : पूना कॉलेज येथे निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर किरकोळ कारणावरून १० ते १५ जणांनी राडा घालून, एका तरुणाला धारदार हत्याराने मारहाण केली.
५ जुलै : वानवडीत मध्यरात्री दोन गट भिडले. दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण.
१२ जुलै : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येऊन हातात कोयते आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एका तरुणावर हल्लाही केला.
२० जुलै : भवानी पेठ आणि कोंढवा येथे टोळक्याचा राडा.
२३ जुलै धनकवडी परिसरात गाड्यांची तोडफोड दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड
4 ऑगस्ट किटकटवाडी या ठिकाणी गोळीबारानी पैठणी गाड्यांची तोडफोड
5 ऑगस्ट दोन वाहन एकमेकांना वाचण्यावरून वाद; तरुणांकडून हवेत गोळीबार
5 ऑगस्ट हडपसर भागात गाड्यांची तोडफोड, कोयते आणि तलवारीने वार
6 ऑगस्ट पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठ भागात कोयत्याने वार गाड्यांची तोडफोड, राजकीय नेत्याच्या जावयाने गाड्यांची तोडफोड केली प्रकार
7 ऑगस्ट एमआयटी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांचा राडा
आणखी वाचा
Comments are closed.