निलेश चव्हाण विरोधात पुणे पोलिसांची लूकआऊट नोटीस, वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावल्याचा आरोप

पुणे : शशांक हगवणेचा साथीदार आणि बाळ मागण्यासाठी आलेल्या वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणविरोधात लूकआऊट नोटीस (Lookout Notice Against Nilesh Chavan) काढण्यात आली आहे. निलेश चव्हाण परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढल्याची माहिती आहे. निलेशच्या घरातून लॅपटॉप देखील जप्त करण्यात आला आहे.

आपल्याच पत्नीचे आणि इतर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप निलेश चव्हाणवर आहे. याशिवाय बंदुकीचा धाक दाखवून निलेश चव्हाणने वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावलं होतं. आता निलेश चव्हाणला पुणे पोलीस कधी गजाआड करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nilesh Chavan Look Out Notice : पोलिसांच्या चुकीमुळेच निलेश चव्हाण फरार

पोलिसांच्या चुकीमुळेच निलेश चव्हाण फरार झाल्याचा आरोप कस्पटे कुटुंबीयांनी केला आहे. वैष्णवीचे काका मोहन कस्पटे म्हणाले की, “पोलिसांना जेव्हा कल्पना दिली होती तेव्हाच जर पोलिसांनी निलेश चव्हाणला अटक केली असती तर तो आज पळाला नसता. निलेश चव्हाण कुठे गेला आहे त्याचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा. पोलिसांनी तत्परता दाखवून तातडीने त्याला अटक केली पाहिजे.”

राजद्रहा हागावणे न्यूज: हॅग्यूनच्या तीन कार सील.

वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा राजेंद्र आणि मोठा दीर सुशील फरार होते. सुरूवातीला एन्डेव्हर कारने प्रवास करणाऱ्या हगवणे बाप बेट्यानं प्रवासादरम्यान वाहनं बदलली. पोलिसांना सहज माग काढता येऊ नये म्हणून राजेंद्र आणि सुशील वाहनं बदलत होते अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी एन्डेव्हर, बलेनो आणि थार या तिन्ही गाड्या जप्त केल्यात. यातील एन्डेव्हर ही स्वतः हगवणेच्या मालकीची आहे. बलेनो ही मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आहे. तर थार ही हगवणेंच्या एका नातेवाईकाच्या मालकीची असल्याची माहिती आहे.

Vaishnavi Hagawane Suicide Case : पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

वैष्णवी आत्महत्या प्रकरणात, पुणे पोलिसांचा तपास पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात राहिल्याचं दिसतंय. अशातच पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित करणारी आणखी एक बाब समोर आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार झालेला सासरा राजेंद्र हगवणेच्या शोधासाठी पुणे पोलीस 18 मे रोजी पवना परिसरातील बंडू फाटक यांच्या फार्महाऊसवर गेले होते.

त्या दिवशी पोलिसांकडून कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर 23 मे रोजी हगवणे बाप-बेट्याला याच फार्महाऊसमधून अटक करण्यात आली. हगवणे पिता-पुत्र पोलिसांना चकवा देत होते की पुणे पोलिसांच्या चुकीच्या तपासामुळे त्यांना लपंडाव खेळण्यासाठी सूट मिळाली होती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=yhxhnphsppw

अधिक पाहा..

Comments are closed.