गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पुणे पोलीसांचा मोठा निर्णय, वाहनांच्या तोडफोडीनंतर पोलीसांची ‘ही’

पुणे: पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाढती वाहनांची तोडफोड, कोयता गँगची दहशत, चोऱ्या, लैंगिक अत्याचार, मारहाणीचे प्रकार घडत असताना शहरात शांतता आणि सुव्यवस्था रहावी यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तानी कॉप 24 उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे पोलीसांनी पुढचं पाऊल टाकत वाढत्या गुन्हेगारीसाठी मोठा निर्णय घेतलाय. (Pune Police)

पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘गुन्हेगार दत्तक योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, घरी भेट देणे आणि ठाण्यात बोलावून तपासणी करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत. गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी  पुणे पोलिसांचा हा नवा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे.

पुणे पोलीसांनी तयार केली गुन्हेगार दत्तक योजना

शहरातील गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या गुन्हेगारी समाजविघातक कारवायांना चाप लावण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी गुन्हेगार दत्तक योजना तयार केली आहे. या अंतर्गत पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच्या यादीतील गुन्हेगाराच्या हालचाली तपासणी,त्यांच्या घरी भेट देणे किंवा त्याला ठाण्यात बोलून तपासणी करणे अधिक गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत.

पुणे शहरात गेले काही दिवसात वाहनांची तोडफोड घटना घडल्या आहेत.या प्रकरणाची पालकमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन पुणे पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या घडामोडीनंतर पुणे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी एक बैठक घेतली .या बैठकीत दत्तक योजनेसह वाहन तोडफोडच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना जरब बसवण्याच्या आदेश पोलिसांना दिले. गुन्हेगारावर एम पी डी ए,तडीपारी,मकोका अंतर्गत कारवाईचे अदेशही सहायुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. गुन्हेगार दत्तक योजनेद्वारे पुणे पोलिस शहरातील नामचीन गुन्हेगारांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणार आहेत. नियमित तपासणीमुळे ते पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर जात असल्यास वेळीच कारवाई करता येईल. पुण्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘कॉप 24’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु

पुणे शहरात पोलिसांचे अस्तित्व अधिक दृढ करण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी ‘कॉप 24’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुणे पोलिसांनी सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत 726 पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, सध्या या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच त्यांच्या सेवेची सुरुवात होईल, ज्यामुळे पुणेकरांना 24 तास गस्त घालणाऱ्या पोलिसांची मदत मिळणार आहे.

हेही वाचा:

Pune Crime : पुण्यात गुन्हेगारांचा केला जाणार करेक्ट कार्यक्रम, पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता…

अधिक पाहा..

Comments are closed.