निलेश घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, 40 कागदपत्रं जप्त, काय-काय सापडलं?
Nilesh Ghaywal Pune Crime: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत असलेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पुणे पोलिसांनी (Pune Police) धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी निलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) घरी धाड टाकून संपूर्ण घराची झडती घेतली. या झाडाझडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. (Pune Crime news)
पोलिसांना निलेश घायवळ याच्या घरी मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची कागदपत्रं, पासबुक आणि इतर साहित्य मिळाले. जमिनींचे हे व्यवहार मराठवाड्यातील पवनचक्यांच्या जवळपासचे आहेत. त्याचबरोबर घायवळच्या घरातून पोलिसांना अनेक जिवंत काडतूसं सापडली आहेत. त्यामुळे पोलिसांनी घायवळवर आणखी एक गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी घायवळच्या घरातून एकूण 40 कागदपत्रे जप्त केली. पुण्यात गुन्हेगारी क्षेत्रात वावरणाऱ्या घायवळने काही वर्षांपासून त्याच बस्तान नगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये बसवले होते. या भागातील पवनचक्की कंपन्यांच्या मालकांना धमकावून निलेश घायवळ याने भरपूर पैसे कमावले होते. त्यासाठी या भागातील राजकीय नेत्यांचं त्याला पाठबळ मिळाल्याचे सांगितले जाते. त्याची परतफेड घायवळ या नेत्यांना त्यांच्या राजकारणात मदत करून करायचा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका वस्तीत घायवळ टोळीच्या गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. यामध्ये संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी घायवळ गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. पुणे पोलिसांनी लगेच निलेश घायवळचा शोध सुरु केला होता. परंतु, तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली होती. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही निलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला आणि पोलिसांनी त्यासाठी घायवळला चारित्र्य प्रमाणपत्र कसे दिले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
Pune crime news: चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या ‘त्या’ व्यक्तीचा मोबाईल चेक करा, रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
निलेश घायवळ याचे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंध असल्याचा अप्रत्यक्ष आरोप शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे, तो चंद्रकांत पाटील यांच काम बघतो, त्याच्या सर्व मोबाईलची आणि नंबरची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. घायवळ आणि तो किती वेळा बोलला त्याने दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. घायवळ एकटा काही करू शकत नाही पोलिसांनी आज ठरवलं तर घायवळ नेस्तानाबूत होईल. पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी ही पिलावळ वाढवली आहे त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे रविंद्र धंगेकर यांनी म्हटले होते.
https://www.youtube.com/watch?v=L7fsrgtrnja
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.