वैष्णवी हगवणे प्रकरणात 6 बडे पोलीस अधिकारी रडारवर, राजेंद्र हगवणेला कसं वाचवलं?

गुन्हेगारीची बातमी ठेवा: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हगवणे कुटुंबाच्या विरोधात त्यांच्या सुनांकडून वेळोवेळी आलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नाही. वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane) बाळाचं अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे पोलिसांनी (Pune Police) एकप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हगवणे कुटुंबीयांनीच पाठीशी घातल्याचा आरोप होतोय. आता कामात हयगय करणाऱ्या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जातोय.

वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पण ती केवळ १ मिनिटं १० सेकंदात आटोपली. एवढ्या संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी सव्वा मिनिटही न देणारे पुणे पोलीस टीकेचे धनी बनलेत. मुळातच वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबीयांनी मोठी सून मयुरीचाही अतोनात छळ केला होता. मयुरीनं नोव्हेंबर २०२४ मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली.  गुन्हा दाखल होऊनही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी कारवाई केली नाही. मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी पावलापावलाला हलगर्जीपणा केलाय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळाची सहा दिवस आबाळ झाली.

Pune Police: पुणे पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांना कुठे-कुठे फ्री हँड दिला?

फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता, पण त्याला अटक करण्यात आली नाही. 20 मे रोजी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटुंबीय वारजे पोलीस ठाण्यात गेले. आमची हद्द नाही, असं सांगत पीआय विश्वजीत कायंगडे यांनी तक्रार घेतली नाही. बावधन पोलीस स्टेशनचे पीआय विजय विभुते यांनीही कस्पटे कुटुंबीयांची तक्रार घेतली नाही. निलेश चव्हाणविरुद्ध बाळाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदला नाही

निलेश चव्हाणच्या बायकोची तक्रार गांभीर्यानं घेतली असती तर तो आज मोकाट नसता. निलेशच्या लॅपटॉपवरील अश्लील चित्रफितीत असणाऱ्या महिलांशी जबरदस्ती झाली का, याची पोलिसांनी चौकशी केली नाही. पोलीस व सरकार हे हंगामी पद्धतीने ॲक्शन मोडमध्ये येत आहे का? वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणातील पोलिसांचा तपास हलगर्जीपणाचा आहे. हलगर्जीपणा करणारे पोलीस आणि दुर्लक्ष करणारा महिला आयोग आहे, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले.

वैष्णवीच्या अंगावर अनेक खुणा असूनही हगवणे कुटुंबीयांवर सौम्य कलमं लावल्याचाही आरोप केला जातोय. वैष्णवीच्या कसेमध्ये संशय येण्यासारखा प्रकार आहे. कलमं लावली आहेत ती सौम्य प्रकारची आहेत. 19 खुणा वैष्णवीच्या अंगावर आहेत. आमचं म्हणणं आहे ती हत्या आहे. त्याचे कलम लागणे गरजेचे आहे, 302 ब ची आम्ही मागणी करतोय. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय, असे शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील पोलीस खाते प्रत्येक चौकी पोलीस स्टेशन हे राजकारण्यांच्या दबावाखाली काम करतात. हुंडाबळीच्या केसेस सुद्धा दबावाखाली चालवत असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकत असतील तर ही राजकारणाच्या बाबतीत खूप चिंताजनक परिस्थिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Vaishnavi Hagawane suicide case: वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणते पोलीस अधिकारी रडारवर?

1. पीआय विश्वजीत कायंगडे
2. पीआय विजय विभुते
3. पीआय संतोष गिरी गोसावी
4. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड
5. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे वर होते
6. इग जॅलिन सुपकर

https://www.youtube.com/watch?v=cfeee-ilop4

आणखी वाचा

दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा कस्पटेंना फोन; वैष्णवीच्या वडिलांच्या CM कडे 2 मागण्या

वैष्णवी हगवणेंची हत्या की आत्महत्या? राजेंद्र हगवणे अजितदादांचे जवळचे म्हणून अटक नाही का? पुणे पोलिसांनी स्पष्टच सांगितलं

अधिक पाहा..

Comments are closed.