पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या खटल्याची लवकरच सुनावणी, सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये अनेक मोठे खुलासे समोर आले होते. या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचे कनेक्शन देखील असल्याच्या चर्चा होत्या. त्याचबरोबर या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र, तपासामध्ये मोठे खुलासे झाले, या प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट समोर आली आहे.पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाची लवकरच न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. या प्रकरणामध्ये सध्या एक प्रकरण बाल न्यायालयामध्ये, तर दुसरे प्रकरण शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू होणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या घरच्यांनी सर्व यंत्रणांना हाताशी धरलं. रक्तातील अल्कोहल प्रमाण कळू नये, यासाठी ससूनच्या डॉक्टरांना पैसे देऊन अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील पुरावे बदलण्यासाठी बराच आर्थिक व्यवहारही झाला असल्याचं समोर आलं आहे.

अपघात झाल्यानंतर रक्तातील अल्कोहल प्रमाण तपासण्यासाठी दिलेल्या रक्ताचे नमुने बदलले गेले. यामध्ये अल्पवयीन मुलाचा आणि त्याच्या आई-वडील, आजोबा यांचा सहभाग असल्याचं समोर आलं. त्यांच्यासह डॉक्टरांनाही या प्रकरणात अटक झाली. याप्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर लवकरच सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी होणार आहे. यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे हे असणार आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकली गेली.

त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा दिल्या आणि जामीन मंजूर केला होता.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाला घटनेच्या अवघ्या 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर करण्यात आला होता. हा जामीन ज्यांनी दिला त्या बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर शिस्तभांगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने सरकारकडे केली होती. अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रक्रिया उमटल्या होत्या.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.