25 ते 28 या चार दिवसांसाठी केलेलं हॉटेल बुक; शुक्रवारीही अशीच पार्टी झाल्याचा पोलिसांचा दावा, आ

पुणे: पुणे पोलिसांनी खराडी येथे छापा टाकून एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीमधून माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना रविवारी पहाटे अटक केली. या पार्टीत अंमली पदार्थ सापल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे. शनिवारी रात्री पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटवर ही पार्टी सुरु झाली होती. मात्र, अशीच पार्टी शुक्रवारी देखील झाली होती असा पोलीसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसांसाठी तो फ्लॅट बुक केला होता. त्यामुळे पुणे पोलीस शुक्रवारी झालेल्या पार्टीची देखील चौकशी करणार आहेत. त्यासाठी ज्या फ्लॅटमधे पार्टी झाली, तिथले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणार आहेत.

खराडीमधील “आफ्टर पार्टी” पूर्वी आरोपींच्या दोन पार्ट्या

पुण्यातील खराडी मधील “आफ्टर पार्टी” पूर्वी आरोपींच्या 2 पार्ट्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीची टाईमलाईन “ABP” च्या हाती आली आहे. पुण्यातील खराडी परिसरातील रेव्ह पार्टीपूर्वी 2 ठिकाणी पार्टी झाली होती,अशी माहिती समोर आली आहे.

काय आहे टाईमलाईन जाणून घ्या

-खराडी येथे जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणीनगर मधील पबमध्ये पार्टी केल्याची माहिती समोर आली होती.
-कल्याणीनगर मधील पब 1.30 वाजता बंद झाला होता.
-दुसरी पार्टी मुंढवा भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली होती.
-हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे 3 वाजेपर्यंत पार्टीला परवानगी होती.
-“आफ्टर पार्टी” करण्यासाठी स्टे बर्डमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये पार्टी केली.
-स्टे बर्ड खराडीमध्ये असलेले हॉटेल आहे.
-सकाळी 5 ते 6 दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी केली
– घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट पोलिसांनी जप्त केला.
अदृषूकपुणे पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं.

पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले, हे राजकीय षडयंत्र

प्रांजल खेवलकर यांचे वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी हे राजकीय षडयंत्र असून पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले असल्याचा युक्तीवाद केलाय. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय षडयंत्र असल्याचं वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितलं. आरोपींनी कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं. पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लांट केले असावेत. आमच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही किंवा ते जवळही बाळगले नसल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

‘पोलीस साध्या वेशात येऊन गेले, पोलिसांनीच सगळं केलं असावं’

‘प्रांजलला या अगोदर तीन वेळी अडकवण्याचा प्रयत्न झाला.यातील एक ही कलम लागू होत नाही.पोलिस गेले, पोलिसांनी व्हिडीओ शूटिंग केलं. यावर कारवाई झाली पाहिजे. कशासाठी कोठडी द्यावी कारणं द्यावे. यातील काही जण गुन्हेगार आहे म्हणून कोठडी का द्यावी. CCTV फुटेज आहे आमच्याकडे. मला अडकवायचे होते त्यासाठी एवढं केलं का? पोलिसांनी अगोदर पाहणी केली का? या ठिकाणी काही अमली पदार्थ आढळून आले, पण कुठे दुसरीकडे मिळून आला. गुन्हा जामीन होऊ शकतो. राजकीय द्वेषातून हे होत असेल तर चुकीच आहे. धूळफेक करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे.यात काही रोल माझा नाही.माझ्यासमोर सुद्धा कोणी अस काही केलं नाही.पोलिसांनी हे सगळ केलं असावे असा माझा आरोप आहे.’ असेही आरोपीच्या वकिलांनी सांगितलं.

‘या अगोदर दोन ठिकाणी पोलिस साध्या वेशात येऊन गेले होते.माझ्याकडे एक ही गोष्ट आढळून आली नाही.एन डी पी एस बाबत खूप रोल आहेत.अंमली पदार्थ कोणाकडून आणले त्याचा तपास व्हावा.झालेल्या सगळ्या भविष्यात घडणाऱ्या घटनासाठी कशाला पोलिस कोठडी हवी आहे? असा सवालही आरोपीच्या वकिलांनी केला. हॉटेल परिसरात पोलिस येऊन गेले आहेत.सगळे घेऊन आले आहे.अमली पदार्थ कोणी घेतले कोणी आणले त्याचा तपास करावा.हे रेकॉर्डचे गुन्हेगार नाही.बंदूक ठेवून शिकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.मी काही केलं नाही माझा संबंध नाही.त्यामुळे प्रांजल खेवलकर याला जामीन मिळावा.’ असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=xd7mggop__8

आणखी वाचा

Comments are closed.