पुण्यात शिवसेनेचे शहराध्यक्ष संतापले, बैठकीतून तडकाफडकी बाहेर, पडद्यामागं नेमकं काय घडलं?

पुणे शिवसेना बातम्या: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे (Mahapalika Election)  बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या पुण्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पुण्यात भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. दरम्यान, अशातच पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आज बैठकीदरम्यान मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. ही बैठक अर्धवट सोडून पुण्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. ते नाराज दिसत होते पण, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, नाना भानगिरे नाराज का होते? याची माहिती समोर आली आहे.

नाना भानगिरे रागावले असते का?

विजय शिवतारे, निलम गोऱ्हे यांनी आपल्या मर्जीचे उमेदवार देत होते, त्याला नाना भानगिरे यांनी विरोध केला होता. 25 लोकांची यादी विजय शिवतारे आणि निलम गोऱ्हे यांनी भाजपकडे दिली होती. मात्र, 30 ते 35 उमेदवार देण्यात यावेत अशी मागणी नाना भांगरे यांनी भाजपकडे केली होती. मात्र, त्यालाही विजय शिवतारे आणि नीलम गोरे यांनी विरोध केला होता. मर्जीतील कार्यकर्त्यांनाच विजय शिवतारे यांनी उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळं नाना नाना भानगिरे संतापले होते. त्यानंतर संतापून नाना भानगीरे बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुण्यात सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं खुद्द मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. पण भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नाही म्हणून शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली होती. सुरुवातीला नीलम गोऱ्हे यांनी भाजपकडे 60 जागांच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे. पण भाजप केवळ 12 जागा देणार असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे महायुतीचं जागावाटप अद्याप निश्चित झालेलं दिसत नाही. असं असताना पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आज बैठकीदरम्यान मोठा राडा झाला आहे.

बैठकीत वाद झाल्याने नाना भानगिरे हे तडकाफडकी बाहेर पडले

शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांच्यात बैठकीत मोठा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नाना भानगिरे यामुळे भावूक झाल्याची माहिती आहे. बैठकीत वाद झाल्याने नाना भानगिरे हे तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. विजय शिवतारे यांच्या मर्जीतल्या माणसांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप नाना भानगिरे यांचा आहे.

आणखी वाचा

Comments are closed.