सिंहगडावरती नेमकं काय घडलं? गौतम गायकवाड कुठे होता? संदीप गिल यांनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे : सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या 24 वर्षीय तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाने गेल्या पाच दिवसांत रहस्य निर्माण केले होते. पुण्यातील गौतम गायकवाड आपल्या मित्रांसोबत तानाजी कडा परिसरात गेला असताना तो अचानक नजरेआड झाला. दरीत कोसळल्याची भीती व्यक्त होत असताना NDRF, अग्निशामक दल, वन विभाग आणि पोलिसांनी सलग शोधमोहीम हाती घेतली. मात्र तरीही त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात तो दिसल्याचा दावा झाल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले. त्यामुळे तो खरोखरच दरीत पडला की जाणूनबुजून बेपत्ता झाला, यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

त्याची चप्पल त्या ठिकाणी आम्हाला सापडली

संदीप सिंह गिल यांनी याप्रकरणी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान गौतम गायकवाड नावाचा तरुण आपल्या चार मित्राबरोबर पर्यटनासाठी सिंहगड किल्ल्यावरती आला होता. परंतु तो तिथून अचानकपणे गायब झाल्यानंतर आमच्याकडे याबाबतची माहिती आली. या प्रकरणी मिसिंग केस दाखल करण्यात आली. पोलीस पथक त्याचबरोबर हवेलीचे आपत्ती निवारण टीम आहे, यांनी मिळून रात्रभर तरुणाचा शोध घेतला, त्याची चप्पल त्या ठिकाणी आम्हाला सापडली. परंतु रात्रभराच्या शोधानंतर तो कुठे सापडला नाही किंवा कोणती माहिती मिळाली नाही.

त्याची तब्येत ठीक नव्हती

चार दिवस त्याच्या नातेवाईकांकडे कुटुंबीयांकडे आणि मित्रांकडे सखोल तपास केला गेला. त्यामध्ये काही महत्त्वाची माहिती मिळाली नाही आणि तोही सापडला नाही. त्यानंतर काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तो गड किल्ल्यावरील एका ठिकाणी तो ओरडत होता. म्हणून स्थानिकांनी तेथील गार्डला सांगितलं, त्यानंतर पोलिसांनी ते चौकशी केली आणि तो सापडला त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तो सापडला. त्यावेळी त्याची तब्येत ठीक नव्हती, त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे, सापडला त्यावेळी त्याची तब्येत ठीक नव्हती. आता त्याच्याकडून सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. गेल्या चार दिवस तो कुठे होता. आजूबाजूच्या परिसरात होता की नाही, कारण ज्या दिवशी तो गायब झाला, त्याच दिवशी एक जण हुडी घालून लपत जात असताना एक व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर आता या सर्व प्रकरणाचा चौकशी त्याकडे केली जाईल.

गौतम गायकवाड फळांचा व्यवसाय करतो

तो बेपत्ता झाल्यानंतर चार दिवस आम्ही तपास करत होतो. त्यावेळी त्याच्या मित्रांनी पैशांची देवाण-घेवाण अशा प्रकारचे माहिती आम्हाला दिली होती, परंतु त्याबद्दल आमच्याकडे विशेष काही पुरावे नाहीत, त्यामुळे त्याच्यावर अधिक बोलणं आता योग्य ठरणार नाही, त्याच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर सर्व माहिती समोर येईल. गौतम गायकवाड फळांचा व्यवसाय करतो. तो इतर राज्यांमध्ये फळ पाठवतो हा त्याचा व्यवसाय आहे. त्यादिवशी मात्र तो फिरण्यासाठी आला होता, अशी माहिती आहे. चौकशीअंती त्याच्याकडून सर्व माहिती समोर येईल असेही संदीप गिल यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=tjiv39bcu48

आणखी वाचा

Comments are closed.