पुणे हादरले! आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका 47 वर्षीय नराधमाने अडीच वर्षाच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विजय भोसले नावाच्या नराधमाला अटक केली आहे.
विजय भोसले याने सोमवारी दुपारी त्याच्या शेजारी राहणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलीला आंबे खाण्यासाठी घरात बोलावले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर पालकांनी तिला महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चिमुरडीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
Comments are closed.