भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उमेदवारी मागे घेण्याची शक्यता

Pune Vidhanparishad Election : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. आजपासून अर्जाची छाननी होणार होणार आहे. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये बंडखोरीचे (Vidhan Parishad Election 2026)  प्रमाण जास्त असल्याने या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी आणि त्यांची मन धरणीसाठी प्रयत्न करावी लागणार आहे. पुण्यात तर राष्ट्रवादीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला आहे, पार्थ पवारांचे मित्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे सुनील टिंगरे नाराज असल्याचे समोर आले. शेवटी विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही अर्ज दाखल केलाय. तर भाजपच्या प्रदीप कंद यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, प्रदीप कंद उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे.

प्रदीप कंद यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची  भेट

भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद पुण्यातून रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीला जागा सुटल्याने प्रदीप कंद यांनी बंडखोरी केली होती. आमदार राहुल कुल यांच्या मध्यस्तीनंतर प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रदीप कंद यांची बंडखोरी शमण्याची शक्यता आहे.

पुण्यात 7 उमेदवारांचे अर्ज, दोन्ही राष्ट्रवादीसह, भाजप, अपक्षांनी भरले अर्ज

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या प्रदीप कंद यांनी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. तर दोन अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जाची छाननी आज (मंगळवारी) होणार असून अर्ज माघारीसाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.(Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी 11अर्ज भरले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विक्रम काकडे यांनी अधिकृत अर्ज भरला आहे. तर याच पक्षाचे सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. टिंगरे यांचा अर्ज डमी असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे श्रीकांत पाटील तसेच तुषार कामठे यांनी अर्ज भरला आहे. यातील कामठे यांचा अर्ज डमी असल्याची माहिती आहे. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी भाजपतर्फे तसेच अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. याशिवाय उमेश म्हेत्रे आणि रणजीत तरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अर्जाची छाननी मंगळवारी (दि. २) होणार असून अर्ज माघारी बुधवारपर्यंत (दि. ४) घेता येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.(Vidhan Parishad Election 2026)

महत्वाच्या बातम्या:

Vidhan Parishad Election 2026: पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?

आणखी वाचा

Comments are closed.