मैदानावरचे कट्टर वैरी आता एकाच संघात! IPL 2026 मध्ये अश्विनचा गुपचूप मोठी खेळी; पाकिस्तानी स्टा

आर अश्विन एमएलसी 2026 : भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) आयपीएल 2026 (IPL 2026) दरम्यान अचानक मोठा निर्णय घेतला आहे, तो आता अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (MLC) मध्ये सहभागी झाला आहे. आगामी हंगामासाठी त्याला सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स (San Francisco Unicorns) संघाने करारबद्ध केले आहे. अश्विन हा MLC मध्ये खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.

अश्विनने डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर 2025 हंगामानंतर त्याने आयपीएललाही निरोप दिला. याआधी तो ऑस्ट्रेलियातील सिडनी थंडर संघाशी जोडला गेला होता, मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नव्हते. त्यामुळे ही त्याची परदेशी टी-20 लीगमधील दुसरी संधी आहे.

अश्विन पाकिस्तानी स्टार्ससोबत खेळणार आहे

MLC चा हा चौथा हंगाम असून, तो 18 जूनपासून सुरू होणार आहे आणि 18 जुलैला अंतिम सामना खेळला जाईल. या लीगमध्ये एकूण सहा संघ सहभागी होतात. यंदाचे सामने टेक्सस, लॉस एंजेलिस आणि ऑकलंड येथे खेळवले जाणार आहेत. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने अद्याप एकदाही विजेतेपद मिळवलेले नाही. 2024 मध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली होती, मात्र वॉशिंग्टन फ्रीडम संघाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

या संघात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf), ऑस्ट्रेलियाचे जेक फ्रेझर-मॅकगुर्क आणि मॅथ्यू शॉर्ट, तसेच न्यूझीलंडचे फिन ऍलन आणि टिम सायफर्ट हे खेळाडूही खेळतात.

अश्विनची प्रतिक्रिया

MLC मध्ये सामील होण्याबाबत अश्विन म्हणाला की, “अमेरिकेत राहणाऱ्या लोकांमध्ये आणि मुलांमध्ये क्रिकेटबद्दल मोठी उत्सुकता आहे. मला हा अनुभव घ्यायचा आहे आणि MLC मध्ये खेळण्याचा अनुभव कसा असेल हे पाहायचे आहे.”

फ्रँचायझीची प्रतिक्रिया

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचे CEO जॉनी ग्रेव यांनी सांगितले की, “अश्विन पहिल्यांदाच भारताबाहेर खेळणार आहे. त्यांच्या दर्जाच्या खेळाडूला संघात सामील करून घेणे हे MLC लीगने गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रगतीचे प्रतीक आहे.”

MLC मधील भारतीय संबंध

MLC मध्ये भारतीय वंशाचे अनेक खेळाडू यापूर्वी खेळले आहेत. यामध्ये मोनांक पटेल आणि हरमीत सिंग यांचा समावेश आहे. या लीगमधील सहा संघांपैकी तीन संघ आयपीएल फ्रँचायझींशी संबंधित आहेत. एमआय न्यू यॉर्क (मुंबई इंडियन्स), लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (कोलकाता नाईट रायडर्स) आणि टेक्सास सुपर किंग्स (चेन्नई सुपर किंग्स) हे त्याचे उदाहरण आहेत.

हे ही वाचा –

Virat Kohli Flying Kiss Anushka Sharma : भर मैदानात विराट कोहलीचा अनुष्कासाठी तो फ्लाईंग किस अन्….; मालकीण अनन्या बिर्ला आली मध्ये, नेमकं घडलं काय?

आणखी वाचा

Comments are closed.