ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीवर आर. अश्विनची मोठी प्रतिक्रिया; 'या' चुकीमुळे होतोय त्रास
चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएल २०२६ मध्ये ६ पैकी केवळ २ सामने जिंकू शकला आहे. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा फॉर्म सध्या एक मोठी समस्या बनला आहे, ज्यामुळे फ्रँचायझीला पुनरागमन करणे कठीण जात आहे. या विषयावर सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. आयपीएल २०२६ मधील ऋतुराज गायकवाडच्या फॉर्मबाबत आता रवीचंद्रन अश्विनने मोठे विधान केले असून त्यामागचे नेमके कारणही स्पष्ट केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या फॉर्मबद्दल ‘जिओहॉटस्टार’च्या मॅच सेंटर लाईव्हवर बोलताना सीएसकेचा माजी खेळाडू रवीचंद्रन अश्विन म्हणाला, ‘ऋतुराजसाठी धावा करण्याची ही सर्वोत्तम संधी होती. आयुष म्हात्रेने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ते पाहता ऋतुराजला जास्त जोखीम घेण्याची किंवा वेगाने धावा काढण्याची गरज नव्हती. संघ पॉवरप्लेमध्ये वेगाने पुढे जात होता. ऋतुराजसाठी थोडा वेळ खेळण्याची, काही धावा करण्याची आणि फॉर्ममध्ये परतण्याची हीच योग्य वेळ होती. आयुष म्हात्रे बाद झाल्यानंतर ऋतुराजला एक अतिशय चांगला चेंडू मिळाला; त्याला पुल शॉटवर हरवणे सोपे नाही. मला फक्त असे वाटते की, तो सध्या प्रचंड दबावाखाली आहे आणि त्याचे मन थोडे गोंधळलेले वाटत आहे.’
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चेन्नईसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने १३ चेंडूत १९ धावा केल्या आणि तो बाद झाला. याआधीही तो अशाच प्रकारे सेट झाल्यानंतर आपली विकेट गमावत आहे. गायकवाड फॉर्ममध्ये परतल्यास सीएसकेचा संघ अधिक मजबूत होईल. त्यातच चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू आयुष म्हात्रे आता जखमी (इंजर्ड) झाला आहे. अशा परिस्थितीत जर गायकवाडची बॅट चालली नाही, तर संघाची कामगिरी आणखी खालावू शकते. अशावेळी आता सर्व जबाबदारी संजू सॅमसनच्या खांद्यावर येईल
Comments are closed.