राघव चढ्ढा यांची राष्ट्रपतींकडे तक्रार

आमदारांसोबत पोहोचले मुख्यमंत्री मान : राइट टू रिकॉलची मागणी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

आम आदमी पक्षाचे 6 खासदार भाजपमध्ये सामील झाल्याच्या विरोधात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मान 90 आमदारांसह दिल्लीत पोहोचले होते. पूर्ण पक्ष दोन तृतीयांश बहुमताने दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो, परंतु केवळ एका सभागृहाचे 6-7 सदस्य असे म्हणत असतील तर ही मनमानी चालणार नाही. ही लोकशाहीची चेष्टा अहे. पंजाबमध्ये भाजपचे 2 आमदार आहेत आणि राज्यसभेचे 6 खासदार झाले आहेत. राज्यघटनेत दुरुस्ती करत राइट टूक रिकॉलची मागणी मी राष्ट्रपतींकडे केली आहे. इलेक्टेड आणि सिलेक्टेडमध्ये फरत असतो, या खासदारांच्या पक्षांतराची मान्यता रद्द केली जावी असे मान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

या खासदारांनी चुकीचे काम केले आहे. हे खासदार भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या विरोधात पंजाब पोलिसांनी कारवाई करू नये का? या खासदारांना सुरक्षा कवच मिळाले आहे का? भविष्यात जर कुठल्याही गैरप्रकाराने सत्तेचा वापर करण्यात आला तर एफआयआर नोंद होणार असे मान यांनी म्हटले आहे.

अशोक मित्तल यांच्या व्यावसायिक ठिकाणांवर ईडीचे छापे पडतात, ज्याच्या 20 दिवसांनी मित्तल यांना वाय श्रेणीची सुरक्षा प्राप्त होते. राघव चड्ढा हे स्वत: भाजपविरोधात बोलायचे. माझे आमदार माझ्यासोबत ठामपणे उभे आहोत. पंजाबमध्ये भाजपचे सध्या केवळ 2 आमदार आहेत, पुढील काळात ही संख्या शून्यही होऊ शकते. लोकांनी या आमदारंना निवडले आणि या आमदारांनी या 6 जणांना राज्यसभेत पाठविले होते. हे लोक इलेक्टेड नव्हे तर सिलेक्टेड आहेत, पंजाबी लोक अशाप्रकारचा विश्वासघात सहन करू शकत नसल्याचा दावा मान यांनी केला आहे.

Comments are closed.