U19 संघात राहुल द्रविडच्या मुलाची एंट्री, BCCI ने श्रीलंका दौऱ्यासाठी जाहीर केला संघ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ज्युनियर क्रिकेट समितीने गुरूवारी (११ जून) आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षाखालील पुरुष संघाची निवड केली आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि दोन बहुदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. यासाठी बीसीसीआयने यशवर्धन सिंग चौहानची कर्णधार म्हणून, तर लक्ष्य रायचंदानी याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
या निवडीतील सर्वात विशेष बाब म्हणजे भारताचे माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहिलेले राहुल द्रविड यांच्या मुलाची संघात निवड झाली आहे. अन्वय द्रविडचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत किशोरवयीन क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. या संघात विकेटकीपर म्हणून रजत बघेल आणि अन्वयचा सहभाग केला आहे. तसेच बहुदिवसीय सामन्यांसाठी विकेटकीपर म्हणून मानव कृष्णा आणि आर्यन संदेश सकपाल यांना निवडले आहे.
या दौऱ्यातील पहिला वनडे सामना ४ जुलै रोजी, दुसरा वनडे सामना ६ जुलै रोजी आणि तिसरा वनडे सामना ९ जुलै रोजी खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने हंबनटोटा येथे खेळले जाणार आहेत. तसेच पहिला बहुदिवसीय सामना १३ ते १६ जुलै दरम्यान गॉलमध्ये आणि दुसरा बहुदिवसीय सामना २० ते २३ जुलै दरम्यान कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे.
भारताचा पुरुष अंडर 19 वनडे संघ– यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), विनीत वेके, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल (यष्टीरक्षक), अन्वय द्रविड (यष्टीरक्षक)अनमोलजीत सिंग, वुटकुरी यशवीर गौड, रोहित अनिल यादव, शविन वी, काव्य परेश पटेल, मोहित उलवा आणि ईशान सूद.
भारताचा पुरुष अंडर 19 बहुदिवसीय संघ – यशवर्धन सिंग चौहान (समर्थक), सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (समर्थक), पटेल कुश, मनाल चौहान, कुशाग्र ओझा, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), आर्यन संदेश सकपाळ (यष्टीरक्षक), हेमकुदेशन जे, बीके किशोर, रोहित अनिल यादव, प्रवीण पटेल, प्रवीण पटेल आणि प्रवीण यादव चिगुरुपती व्यंकट.
Comments are closed.