पक्षाच्या हिताला प्राधान्य देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
Sunetra Pawar NCP Vardhapan Din : 27 वर्षापूर्वी स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. अनेक दिग्गज नेत्यांचे कार्यकर्त्यांचे पक्षाच्या जडणघडणीत मोठं योगदान असल्याचे मत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. आज पक्षाचा 27 वा वर्धापन दिन साजरा करताना भावनिक वातावरण आहे. आपल्या सर्वांचे नेते अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय साजरा होणारा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याचे पवार म्हणाल्या. अजित दादांना विकसीत महाराष्ट्र प्रेरीत होता ह सांगताना सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.
पदाधिकारी कार्यकर्ता आणि त्यांची निष्ठा माझ्या लक्षात
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वेगळ्या परिस्थितीत मी जबाबदारी घेतली आहे. येणाऱ्या सगळ्या गोष्टींची मला जाणीव होती. पदाधिकारी कार्यकर्ता आणि त्यांची निष्ठा माझ्या लक्षात आहे. योग्यवेळी संधी दिली जाईल असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. आतापर्यंत जे घडलं ते मी समजून घेतलं. मी पक्षाचा हिताला प्राधान्य देईल. कुणाचा हस्तक्षेप असेल तर मी लक्ष देईल. दादा ज्याप्रमाणे कडक निर्णय घ्यायचे तो माझा स्वभाव नसला तरी मी तो निर्णय घेईल असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अजित पवारांना जो विकसित महाराष्ट्र अपेक्षित होता त्यानुसार आपण काम करत राहू. शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जाणं म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणं असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. ग्रामीण आणि शहरी भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रभावी उपायोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. आपल्या पक्षाचा एकही कार्यकर्ता मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. बूथ पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समान राखला जाईल. संघटना मजबूत करणे गरजेचे आहे.
प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा ऑक्सिजन आहे. सर्वांनीच लोकसंग्रह वाढवणं समस्या समजून घेणं त्यासाठी सासत्याने प्रयत्न करणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. सर्वानी प्रयत्न करावे, गाव वाडी वस्ती शहर सत्वारवर कार्यकर्तांची फळी निर्माण करायला हवी, पक्षात ज्येष्ठांचा सन्मान करणे, महिलांचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.