‘विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?’ राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दो
राहुल गांधी यांनी अमित शहांना लिहिलेले पत्र काँग्रेस (Congress) नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार आणि पॅलेट गन वापराच्या आरोपांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहित केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले, तसेच पॅलेट गन वापरण्याची परवानगी कोणी दिली, असे दोन थेट सवाल राहुल गांधी यांनी पत्रातून उपस्थित केले आहेत.
Rahul Gandhi Letter to Amit Shah: विद्यार्थ्यांवरील कारवाईवर राहुल गांधींचा आक्षेप
20 जुलै रोजी ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा (Tear Gas) वापर केला होता. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी रविवारी (२६ जुलै) अमित शाह यांना पत्र पाठवून या कारवाईची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, विद्यार्थी निष्पक्ष आणि जबाबदार शिक्षण व्यवस्थेची मागणी करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी सुरक्षा दलांनी अतिप्रमाणात बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींचे अमित शहांना पत्र: 'शेकडो विद्यार्थी जखमी झाले'
राहुल गांधी यांनी पत्रात दावा केला आहे की, पोलिसांच्या लाठीमारामुळे शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले. महिला विद्यार्थिनींनाही मारहाण करण्यात आली असून, त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचे आरोपही त्यांनी पत्रात नमूद केले आहेत. पत्रात राहुल गांधी यांनी पॅलेट गनचा वापर सर्वाधिक धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवरील दृश्यांमध्ये पत्रकारासह अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांनी 19 वर्षीय विद्यार्थी साहिल लोचब याची भेट घेतल्याचे सांगत, पॅलेट गनच्या गोळीमुळे त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असल्याचा उल्लेखही पत्रात केला आहे.
विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला? pic.twitter.com/NDwfka1UqO
—राहुल गांधी (@RahulGandhi) 26 जुलै 2026
राहुल गांधी यांनी अमित शहांना पत्र: या दोन प्रश्नांवर अमित शहाण्णांचे विचार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून राहुल गांधी यांनी दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या घातक साधनांचा वापर करण्यास तुम्ही गृहमंत्री म्हणून मंजुरी दिली होती का? जर नाही, तर ही परवानगी कोणी दिली? साध्या वेशात विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करताना दिसणारे लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला अधिकृत मान्यता कोणी दिली? असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले आहेत. राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Comments are closed.