पंतप्रधान 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
NEET UG 2026 पेपर लीक प्रकरण : नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. पेपर लीक प्रकरणामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकाराला “तरुणांच्या भविष्यासोबतचा गुन्हा” असे संबोधले.
NEET UG 2026 Cancelled : लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी
राहुल गांधी यांनी म्हटले की, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून, कुटुंबांनी कर्ज काढून आणि आई-वडिलांनी दागिने विकून मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना बदल्यात मिळाले ते पेपर लीक, भ्रष्टाचार आणि प्रशासनिक गोंधळ. ही केवळ प्रशासकीय चूक नसून देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला गंभीर अन्याय आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
NEET Paper Leak Scam : ‘पेपर माफिया’वर राहुल गांधींचा निशाणा
राहुल गांधी यांनी आरोप केला की, प्रत्येक वेळी पेपर लीक प्रकरणात ‘पेपर माफिया’ सुटून जातात आणि त्याची शिक्षा मात्र मेहनती विद्यार्थ्यांना भोगावी लागते. अशा घटनांमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास सतत ढासळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
NEET Students Stress : विद्यार्थ्यांवर पुन्हा मानसिक आणि आर्थिक ताण
परीक्षा रद्द झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा तयारी करावी लागणार, मानसिक तणाव सहन करावा लागणार आहे. तसेच त्यांच्यावरील आर्थिक भार वाढणार असून भविष्यासंदर्भात अनिश्चितता निर्माण होणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. जर शिक्षणात मेहनतीपेक्षा पैसा आणि प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत असेल, तर गुणवत्तेचे महत्त्वच संपुष्टात येईल, असं म्हणत राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
NEET 2026 परीक्षा रद्द.
22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे कष्ट, त्याग आणि स्वप्ने या भ्रष्ट भाजप व्यवस्थेने चिरडून टाकली.
काही वडिलांनी कर्ज घेतले,
काही आईने दागिने विकले,
लाखो मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केला,आणि त्या बदल्यात मिळाले, पेपरफुटी, सरकारी दुर्लक्ष आणि शिक्षणात…
—राहुल गांधी (@RahulGandhi) १२ मे २०२६
पंतप्रधान नरेंद्र मोदी : मोदी सरकारच्या ‘अमृतकाल’वर टीका
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटले की, सरकार ज्या काळाला “अमृतकाल” म्हणते, तोच देशातील तरुणांसाठी “विषकाल” ठरत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
NEET Re-Exam: पुढे काय?
National Testing Agency (NTA) ने 3 मे 2026 रोजी झालेली NEET UG परीक्षा रद्द केली असून ती नव्या तारखांना पुन्हा घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी Central Bureau of Investigation (CBI) कडे सोपवली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.