धक्कादायक ! सीमाच्या 13 वर्षीय मुलीवर होता राहुलचा डोळा; पोलिसांच्या तपासातून वेगळाच अँगल समोर
ठाणे : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी (Police) आरोपी प्रियकराला अटक केली आहे. सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचे 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, सीमाने राहुलला हातउसने पैसे दिले होते. मात्र, तिच्याकडून पैशाचा तगादा लावल्यात येत होता. उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा महिला लावत असल्याच्या वादातून त्याने सीमाची भरदिवसा रेल्वे स्थानकावर हत्या (Crime news) केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. राहुल आणि सीमा यांच्यात प्रेमसंबंध होते, गेल्या सहा वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशी धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे. सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते, राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल, अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती.
अंबरनाथ मधील बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेवर तिच्या परिसरात राहणाऱ्याच प्रियकराने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे असून ती 35 वर्षाची आहे, ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यानंतर, सीमाचे प्रेमसंबंध राहुल अरुण भिंगारकर या 29 वर्षाच्या तरुणाशी जुळले. सहा वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशीही धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे. राहुल हा कर्जबाजारी होता, कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता. तर, सीमाचेही राहुलवर प्रेम असल्याने सीमाने जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते.
सीमाला राहुलने लग्नाचे आमिष दाखवले होते, त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते, राहुल सीमासोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला देखील माहिती होते. मात्र, सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते, राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल, अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती. त्यानंतर, राहुल लग्न करणार नसल्यामुळे माझे दिलेले पैसे दे, असा तगादा सीमाने लावला. सीमाच्या बहिणीने तो लग्न करत नसला तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे, असा सल्ला तिलादिला होता.
रेल्वे स्थानकावर भेटले
राहुलने कालच सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देऊन टाकतो असा कॉल केला. त्यावरुन ठरलेल्या भेटीसाठी सीमा दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून ते दोघे पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले, राहुल तुला संपवणार आहे, असे सीमाने तिच्या बहिणीला सांगितले होते. मात्र, प्रेम आहे तो हे पाऊल उचलणार नही अशा भ्रमात सीमा होती. पण, सीमाला संपवण्याच्या तयारीत आलेल्या राहुलने ब्रिजजवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमासोबत वाद केला. दोघांमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारदार शस्त्राने भर दिवसा सपासप वार केले, आणि या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली. सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केले.
हेही वाचा
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
अधिक पाहा..
Comments are closed.