‘मला आधी हॉस्पीटलला ने मी तुझ्या प्रपोजचा…’, अलिबागमध्ये तरुणीवरील हातोडी हल्ला प्रकरणाचं सगळ


अलिबाग: रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ (Raigad Crime News) उडाली आहे. सोशल मीडियावरून झालेली ओळख आणि वाढलेली मैत्री अखेरीस हिंसक व रक्तरंजित वळणावर पोहोचली. सुरज बुरांडे (मूळ रहिवासी आक्षी साखर, सध्या रा. थेरोंडा वरसोल पाडा, ता. अलिबाग, जि. रायगड) या तरुणाने आपल्या प्रेयसीवर लाकडी दांडा असलेल्या लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला (Raigad Crime News) केल्याची धक्कादायक घटना (१० ऑक्टोबर) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.(Raigad Crime News)

Raigad Crime News: तुला एक सरप्राइज द्यायचं आहे

या हल्ल्यातील पीडित तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, सुरज आणि संचिताची ओळख वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर झाली होती. १० ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास सुरजने फोन करून कनकेश्वर मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. ती अनिच्छेने गेल्यानंतर दोघे मंदिरात दर्शन घेऊन खाली उतरत असताना सुरजने “तुला एक सरप्राइज द्यायचं आहे” असं सांगत तिला वडाच्या झाडाखाली नेलं आणि काही क्षण डोळे बंद करण्यास सांगितलं. क्षणातच त्याने बॅगेतून लोखंडी हातोडा बाहेर काढला आणि तिच्या डोक्यावर व कपाळावर जबरदस्त वार केले. त्यामुळे संचिता गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडली. हल्ल्यानंतर सुरजने “तू माझी नाही झालीस, तर कोणाचीही होऊ देणार नाही” असे म्हणत तिला धमकावले आणि अंधार पडोपर्यंत त्या ठिकाणीच बसवून ठेवले. रात्रीच्या सुमारास तीव्र वेदना सहन न झाल्याने पिडीत तरूणीने उपचारासाठी विनंती केली. त्यावर तीने सुरजला “जर तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास, तर तुझ्या प्रपोजचा विचार करेन,” असं सांगितलं. त्यानंतर सुरजने तिला रुग्णालयात नेल्याचे तरूणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.

Raigad Crime News: तू तिला ठार मारायला हवे होते

सुरज बुरांडेने हल्ल्यानंतर आपली बहिणीचा पती विनायक पाटील (रा. साळाव) आणि मित्र सौरभ कुलाबकर यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यावेळी ते घटनास्थळी आले आणि त्यांनी सुरजला “तू तिला ठार मारायला हवे होते” असे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमारास सुरज रुग्णालयात आला आणि पीडितेला धमकावत म्हणाला, “मी तुझ्यावर हल्ला केला आहे ही गोष्ट जर कोणाला सांगितली, तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारेन. माझे काका कसे आहेत, हे तुला माहिती आहे.” तसेच त्याचे भावोजी विनायक पाटील आणि मित्र सौरभ कुलाबकर यांनी सुद्धा जीव घेण्याच्या धमक्या दिल्याने पीडिता घाबरली होती.

सायंकाळी उशिरा उपचारासाठी नेल्यानंतरही सुरज आणि त्याचे साथीदार विनायक पाटील व सौरभ कुलाबकर यांनी तिला सतत ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. या हल्ल्यात तिच्या डोक्याला, पायाला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सुरज बुरांडे आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर कनकेश्वर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी वाचा – alibaug Crime News: मंदिराबाहेर दोघे बसले, अचानक बॉयफ्रेंडनं हातोडा काढला, सपासप वार केले अन् दगडाने…; अलिबाग हादरलं!

आणखी वाचा

Comments are closed.