परळीत प्रियकराने नर्सवर कोयत्याने सपासप वार केले, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, नंतर तरुणाने….

रायगड खून बातम्या: रायगड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणीने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुधागड तालुक्यातील परळी (Parli) येथे हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, ही तरुणी परळीतील ओसवाल रुग्णालयात नर्स म्हणून कामाला होती. तिच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध (Love Relationship) होते. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे या तरुणाने संबंधित तरुणीवर हल्ला केल्याचे समजते. (Raigad News)

या तरुणाने अत्यंत निर्घृणपणे आपल्या प्रेयसीचा खून केला. त्याने कोयत्याने (Koyta) प्रेयसीच्या मानेपासून संपूर्ण अंगावर सपासप वार केले. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर तरुणानेही स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तरुण आणि तरुणी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पाली पोलिस ठाण्याअंतर्गत घटनेचा तपास सुरु आहे.

Pune Crime: पुण्यात 18 वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या

दोन दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील वालेकरवाडी परिसरात रविवारी रात्री 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. कोमल भरत जाधव असे या तरुणीचे नाव होते. कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वाल्हेकरवाडीमधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहात होती. रविवारी रात्री  बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं. कोमल घराच्या खाली आल्यानंतर आरोपींनी तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला होता.

https://www.youtube.com/watch?v=1y4–6 एस 8 डीजेएस

आणखी वाचा

वर्षभरापूर्वीच्या वादाचा घेतला बदला, 17 वर्षीय मुलाला वार करून संपवलं, पिंपरी चिंचवड हादरलं!

पुण्यातील धक्कादायक घटना, नवा व्यापार खेळताना लहान भावाचा वाद; मोठ्या भावाचा नाहक बळी

अधिक पाहा..

Comments are closed.