नगरपरिषदेच्या निकालानंतर 4 दिवसांत नगरसेविकेच्या पतीची हत्या, खोपोलीत जमावाने पोलीस स्टेशनला घे

किरण: रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची मंगेश काळोखे (mangesh Kalokhe) यांची आज (26 डिसेंबर 2025) निर्घृण हत्या करण्यात आली. 21 तारखेला नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागताच ही हत्या झाल्याने खोपोलीत तणावाचं वातावरण आहे. या हत्येनंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय खोपोली पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. खोपोली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू असून नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. संपुर्ण खोपोली शहर बंद करण्यात आले आहे. खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन हिरे यांना सस्पेंड करण्याची मागणी होत आहे. (khopoli crime news )

खोपोली पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल या समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जमाव ठिय्या आंदोलनावर कायम आहे. नागरिक ऐकण्याचा मनस्थितीत नाहीत. मंगेश काळोखे यांनी पोलीसांकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगूनही पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्याचा आरोप होतोय.

नेमकं प्रकरण काय?

मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते. आज सकाळी ते आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनुसार, काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना दिवसाढवळ्या या हत्येच्या घटनेने खोपोली शहर हादरले आहे. मात्र या हल्ल्यामागे नेमकं कारण काय? हा हल्ला कुणी केला, या बाबत तपशील अद्याप कळू शकलेला नाही. त्यामुळे हल्लेखोरांना अटक केल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.

मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे राजकीय हात?

दरम्यान, मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी या हत्येमागे राजकीय वैर असल्याचा गंभीर आरोप केला आहे.21 तारखेला निवडणुक लागताच ही हत्या झाली, याचा अर्थ ही दुर्दैवी बाब असून हा सगळा खेळ राष्ट्रवादीनेच केला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

एकीकडे तपास सुरू असताना, तर दुसरीकडे शहरात निर्माण झालेलं तणावाचं वातावरण आणि पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन यामुळे खोपोलीत खळबळ उडालीय.

Khopoli Crime News : मुलाला शाळेत सोडून परत येताना घात झाला

मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेले होते. मात्र परतताना त्यांच्यावर काही अज्ञातांना हल्ला चढवत निर्घृणपणे संपवलंय. हल्लेखोर हे एका काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटू शकली नसल्याचे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.