गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते
रायगड क्राईम न्यूज: समाजात गुरु-शिष्याचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. मात्र, रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाडमध्ये (Mahad) या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raigad Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महाड येथील ‘गांधी क्लासेस’ मध्ये घडली आहे. या प्रकरणातील पीडित मुलगा सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. क्लासेसचा मालक आणि शिक्षक सुनील गांधी याने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
Raigad Crime News: बेडरुममध्ये नेऊन अश्लील चाळे
पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक सुनील गांधी हा शिकवणीच्या बहाण्याने मुलाच्या गुप्तांगाला स्पर्श करणे आणि अश्लील चाळे करत असे. इतकेच नव्हे तर, क्लासच्या वरच्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या बेडरुममध्ये नेऊन त्याने विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक आणि अश्लील कृत्य केल्याचेही समोर आले आहे. या सलग होत असलेल्या त्रासामुळे पीडित मुलगा प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अखेर त्याने धाडस करून हा सर्व प्रकार समोर आणला.
Raigad Crime News: पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून महाड शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. आरोपी शिक्षक सुनील गांधी याच्या विरोधात ‘बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण’ (POCSO Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकासारख्या जबाबदार व्यक्तीनेच अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण आहे.
Raigad Crime News: महाड पोलिसांकडून तपास सुरु
महाड शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीने अशा प्रकारे इतरही कोणत्या विद्यार्थ्यांची फसवणूक किंवा छळ केला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या घटनेने रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.