तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा

रायगडचे पालकमंत्री : राज्य सरकारकडून शनिवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून (Raigad) राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकमधून (Nashik) भाजपचे गिरीश महाजन (girish Mahajan) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अवघ्या एक दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यामुळे महायुतीतील पालकमंत्रिपदाचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. यामुळे भरत गोगावले विरुद्ध तटकरे वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

नेमकं काय म्हणाले भरत गोगावले?

भरत गोगावले म्हणाले की, आम्ही व्यवहाराने चालणारे आहोत. आमचं काम प्रामाणिक आहे. आम्ही चुकीचं काही करत नाही.  सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणूकीत प्रामाणिकपणे आमचं काम केलं असतं तर आम्ही पालकमंत्रिपदाबाबत विचार केला असता. परंतु त्यांनी आमचं काम केलंच नाही. तटकरे यांनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसला, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. जे स्वतःच्या भावाचे होऊ शकले नाही ते तुमचे-आमचे काय होणार? असा सवाल देखील भरत गोगावले यांनी केला. भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत वादाचा नवा अध्याय सूरु होण्याची शक्यता आहे.

26 जानेवारीला रायगडमध्ये अदिती तटकरेच करणार झेंडावंदन

दरम्यान, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला असला तरी येत्या 26 जानेवारीला रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन हेच झेंडावंदन करणार आहेत. याबाबत शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी (दि. २६) रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या झेंडावंदन करतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.

आणखी वाचा

Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका

अधिक पाहा..

Comments are closed.