न्याय देवतेने आदेश दिला म्हणून शरण! एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही
रायगड बातम्या : रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे पुत्र विकास गोगावलेंसह अन्य आठ जणांना जामीन मंजूर झाला आहे. यानंतर लगेच आज त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विरोधकांना समज देताना मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेच रक्त आहे असं वक्तव्य विकास गोगावले यांनी केलं आहे.
कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नाही
आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री भरत गोगावले यांच्या पुत्र विकास गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेच रक्त आहे असं वक्तव्य विकास गोगावले यांनी केलं आहे. कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नाही. न्याय देवतेने आदेश दिला म्हणून मी शरण गेलो अंस थेट वक्तव्य विकास गोगावले यांनी केलं आहे.
महाड नगरपालिका निवडणुकीतील राडा प्रकरणानंतर मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले फरार होते
महाड नगरपालिका निवडणुकीतील राडा प्रकरणानंतर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले फरार झाले होते. तर उच्च न्यायालयाने थेट महायुती सरकारचे कान टोचत पोलिसांना फटकारले होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच मुंत्र्यांच्यापुढे हतबल आणि असाह्य असल्याचे म्हटले होते. तर गोगावले यांना फटकारत मुलास 24 तासात हजर करण्याचे आदेश देत झापले होते. त्यानंतर विकास गोगावले पोलिसांनी शरण आले होते. त्यानंतर विकास गोगावले यांच्यासह आठ जणांना जामीन मंजूर झाला आहे. यानंतर विकास गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, असं वक्तव्य त्यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुबंळ हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर विकास गोगावलेंसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फरार होते. यादरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी न्यायालयात अटक पूर्व जमिनासाठी धाव घेतली होती.
आणखी वाचा
Comments are closed.